`सोनचिड़िया` सिनेमाला मिळाली कायदेशीर नोटीस
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर स्टारर सिनेमा `सोनचिड़िया` वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर स्टारर सिनेमा 'सोनचिड़िया' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमाच्या चंबलच्या खोऱ्यातील डाकूंच्या जीवनावर आधारलेल्या सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिनेमात चित्रित करण्यात आलेले सिन्स आणि डायलॉगमुळे सिनेमाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
चंबल खोऱ्यातील प्रतीमेला खराब करत बॉलिवूड कित्येक वर्षांपासून कमाई करत आहे. त्याचप्रमाणे आता 'सोनचिड़िया' सिनेमाचे नाव या वादाला जुळाले आहे. 'सोनचिड़िया' सिनेमामुळे चंबलच्या पर्यटनाला गालबोट लागत आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशच्या सरकारनेही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे आणि समाजसेवक योगेंद्र मावेईने सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
चंबलमधील रहिवाश्यांनी 'सोनचिड़िया' सिनेमात चंबलला चुकीच्या पद्धतीत मांडण्यात आल्याचा आरोप केला आहे. सिनेमातील कलाकार आशुतोष राणा , रणवीर शौरी, मनोज वाजपेयी, सुशांत सिंह राजपूत यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. हा सिनेमा १ मार्च रोजी सिनेमागृहात दाखल होणार असून सिमाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे.