मुंबई : बालपण हे प्रत्येकालाच हवंहवंसं वाटतं. कारण ते निरागस असतं त्यात न स्वार्थ असतो ना काही मिळवण्याची शर्यंत. आजकालच्या डिजिटल जगात तर त्याची कमतरता खूप जास्त भासतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालपणातल्या त्या आठवणींमध्ये पुन्हा रमण्यासाठी समर्थ क्रिएशन्स आणि वननेस फिल्म्स निर्मित सोनेरी नक्कीच पहायला हवी. गावी गेल्यावर प्रत्येकाच्या आयुष्यातला सोनेरी क्षण हा काहीसा सारखाच असतो. प्रत्येकाला गावाची ओढ ही कायमचा असते. हेच सोनेरी क्षण निलेश कुंजीर यांनी आपल्या ‘सोनेरी’ या लघुपटात सुंदर पद्धतीने टिपले आहेत.


बालपणी शाळेला सुट्टी मिळाली की गावी जायची तयारी असायची. आजी आजोबांची, लहान भावा बहिणींची सोबत, शेतात फिरणं, कैरी चिंचा पाडणं, बैलगाडी वर फिरणं, नांगर हाकणं, वनभोजन, निंबाच्या झाडाखाली थंड हवेत झोपणं, विहिरीत डोकावून प्रतिध्वनी ऐकणं. या अश्या खूप साऱ्या आठवणी ‘सोनेरी’ पाहताना डोळ्यासमोर उभ्या राहतात. निलेश कुंजीर यांनी हा लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे तर अभिनव पाठक हे निर्माते आहेत. प्रथमेश रांगोळे याने उत्तम रित्या कॅमेऱ्यातून ह्या आठवणी टिपल्या आहेत. नितीन सावंत याचं संगीत आणि प्रशांत कांबळे याने केलेलं साउंड डिझाईन यामुळे लघुपटाने एक वेगळी उंची गाठली आहे.
 
सोनेरी ने नुकत्याच Sandpoint Short Film Festival 2017,USA येथे तब्बल 2600 लघुपटांमधून शेवटच्या 36 लघुपटांमध्ये येण्यासोबतच द्वितीय लघुपटाचे परितोषिकही पटकावले. या शेवटच्या 36 लघुपटांमध्ये 'सोनेरी' हा एकमेव भारतीय लघुपट होता. निलेश कुंजीर यांनी या लघुपटाच्या यशाचे श्रेय पूर्ण टीम ला दिलंय. सोनेरी बद्दल तो पुढे म्हणाला "सोनेरी ने Sandpoint Film Festival येथे भारताचं प्रतिनिधित्व केलं यासारखी आनंदाची गोष्ट नाही. Eric Daarstad (Academy Award Winner Cinematographer) यांना सोनेरी प्रचंड भावली हे सोनेरी चे खरे यश आहे".
 
‘सोनेरी’ ला आतापर्यंत मिळालेले अवॉर्डस -


सोनेरीचे आता पर्यंत मुंबई, ठाणे, लखनऊ, पुणे, कोलकत्ता, दिल्ली अशा डझनभर फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रिनिंग झाले आहे. तसेच बेस्ट इंटरनॅशनल फिल्म, बेस्ट चिल्डन शॉर्ट फिल्म, बेस्ट सिनेमॅटोग्राफर यासारख्या तब्बल ६ अवॉर्डस ने गौरवण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात 4 डिसेंबर रोजी सोनेरी दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल येथे दाखवण्यात येणार आहे.