मुंबई : लव राजन दिग्दर्शित 'सोनू के टीटू की स्वीटी' नावाच्या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्यार का पंचनामा' आणि 'प्यार का पंचनामा 2'ची टीम पुन्हा एकत्र आल्यावर स्क्रिनवर काय दिसू शकतं, याची एक झलक म्हणजे हा ट्रेलर...


सिनेमात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाची कहाणी दोन मित्रांची... ज्यातल्या एकाला 'परफेक्ट गर्लफ्रेंड' सापडलीय... तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा आहे... आता दुसऱ्या मित्राला मात्र ही गर्लफ्रेंड खोटी वाटतेय... आता हे प्रकरण काय आहे, ते ट्रेलर पाहून तुमच्या लक्षात येईलच. 


९ फेब्रुवारी म्हणजेच वेलेन्टाईन्स डेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.