मुंबई  : गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वत्र कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे.  जगात त्याचप्रमाने देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत कोणीही घराबाहेर न पडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता प्रसिद्ध गायक सोनू निगमने कुटुंबासोबत  स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. आपण दुबईत आडकल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. '५ मार्च पर्यंत मी हिमालयात होतो. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे मुंबईतील माझ्या एका कार्यक्रमाला स्थगिती मिळाली. त्यामुळे १७ मार्चपर्यंत मी दुबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिस्थिती जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत भारतात न येण्याचा निर्णय सोनू निगमने घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे सरकारकारला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात मी त्यांच्या पुढील अडचणी वाढवणार नसल्याचं देखील त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.  सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ६४ वर गेली आहे. संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकारपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

#safehands #socialdistancing #staysafe


A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on


तो पुढे म्हणाला, 'मला माझ्या बहिणीसोबत आणि वडिलांसोबत भारतात राहायला आवडतं. परंतू अशा परिस्थित मुंबईत येणं त्यांच्यासाठी कदाचीत धोक्याची घंटा ठरू शकेल. त्यामुळे मी याठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला आहे.' सोनू निगमचा मुलगा दुबईत त्याचे शिक्षण घेत आहे.  कोरोनामुळे निवानच्या शाळेला सुट्टी आहे.  त्यामुळे आमच्याकडे घरात स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी अनेक गोष्टी असल्याचं सांगत त्याने नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. 


आताच्या माहितीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या २९८वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३९ रुग्ण हे परदेशातील आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशभरातून एकूण ५२  कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी म्हणजे  कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकलेले २३ रुग्ण योग्य उपचारानंतर बरे झाले आहेत. तर चार रुग्ण या धोकादायक व्हायरसमुळे मृत्यू पावले आहेत.