भाजी विकणाऱ्या इंजिनियर मुलीला सोनू सूदने दिली नोकरी
तरूणीच्या मदतीला धावून आला सोनू सूद
मुंबई : कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या काळात अचानक आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी सोनू सूदने अनेकांना मदत केली. आता अनलॉक झाल्यानंतरही सामान्यांच जीवन सुरळीत झालेलं नाही. कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या इंजिनिअर मुलीवर भाजी विकण्याची वेळ आली. त्या मुलीच्या मदतीसाठी सोनू सूद धावून गेला. याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
Ritchie Shelson नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून युझरने एक ट्विट करण्यात आलं. या व्हिडिओत एक मुलगी भाजी विकताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत एक पोस्ट शेअर केली त्यामध्ये लिहिलंय, प्रिय सोनू सूद सर, ही श्रद्धा आहे. इंजिनिअर असलेल्या श्रद्धाला कोरोनाच्या काळात कोणतंही कारण नसताना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
युझरने त्या ट्विटवर लिहिलं आहे की, ही मुलगी आपल्या कुटुंबियांसाठी भाजी विकत आहे. कृपया याकडे लक्ष द्या काही मदत झाली तर. सोनू सूदने यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या ऑफिसमधून काही लोकं श्रद्धाला भेटायला गेले. इंटरव्ह्यू झाला आहे. नोकरीकरता लेटर देखील देण्यात आलं आहे.
लॉकडाउनमध्ये सोनू सूदने मजदूर कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली. तो आणि त्याची संपूर्ण टीम कामगारांची मदत करत होते. तसेच काही दिवसांपूर्वी जॉर्जियामध्ये अडकलेल्या ५० भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी सोनू सूद मदत करत असल्याचे समोर आले आहे.