मुंबई : गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात मजुरांचा देवदूत बनलेल्या अभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत सोनू सूदने स्वतः ही माहिती दिली आहे. सोनूने स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोनू सूद हा विलगीकरणात उपचार घेत आहे. सध्या त्याची प्रकृती नीट असल्याची माहिती मिळत आहे. (Bollywood Actor Sonu sood tested corona positive)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनू सूदने काय म्हटलंय ट्विटमध्ये? नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.


बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या भूमिकेत लोकप्रिय असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यात मात्र नायक ठरला आहे. 2020 साली संपूर्ण देशभरात कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरीत मजुरांच्या मदतीला सोनू सूद धावून आला. स्थलांतरितांना सोनू सूदने आपापल्या घरी सुखरूप पोहोचवलं. अनेकांना रोजगार मिळवून देखील दिला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)


कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर सावट आलं होतं. यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आला आहे. CBSE ची परीक्षा रद्द केल्यामुळे सोनू सूदने आनंद व्यक्त केला आहे.