नवी दिल्ली : ग्रामोदय चेंबर ऑफ कॉमर्स अँड टेक्नॉलॉजीने (जीसीओटी) अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) गरीब आणि कमगारांच्या मदतीला पुढे धावून आल्यामुळे बंधु मित्र पुरस्कारने (Gramodaya Bandhu Mitra award)सन्मानित करण्यात आलं आहे. जीसीओटीच्या तीन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  सोनू सूदचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषदेचे अध्यक्ष गुथा सुखेन्द्र रेड्डी यांनी केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी सोनू सूदने  शक्ती अन्नदानमसोबत कायम काम करण्याचं अश्वासन जीसीओटीला दिलं. शिवाय सोनू सूदने कोविड-१९ या माहामारीच्या दिवसांमध्ये अनेक गरजुंची मदत केली असून अनेक मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी सुरक्षित वाहतूक योजनेची व्यवस्था केल्याचं वक्तव्य जीसीओटीचे कार्यकारी अध्यक्ष वसंत कुमार दामस्थपुरम यांनी केलं. 



१५०व्या गांधी जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात सोनू सूदने अनेक गरीबांची मदत केली. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या  कामगारांचे प्रचंड नुकसान झाले. 


अशा संकट समयी अनेक कलाकार, सामाजिक संस्थांनी त्यांच्या मदतीसाठी एक हात पुढे केला. हाती काम नसल्यामुळे या मजुरांनी आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतल. सुरवातीला हे मजूर कामगार पायी, सायकलीवर आपल्या गावी पोहोचले. या दरम्यान अनेक मजुरांचा मृत्यू देखील झाला.


चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे. त्यामुळे सोनूला  'पद्म विभूषण' पुरस्कार देवून सन्मानित करावं अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात होती.