Monitar Sur Nava Dhyas Nava: मराठी मनोरंजनविश्वात संगीताचे कार्यक्रम हे लोकप्रिय आहेत. त्यातील असाच एक कार्यक्रम आहे तो म्हणजे 'सुर नवा ध्यास नवा'. 2018 पासून हा कार्यक्रम आपल्या सर्वांचेच मनोरंजन करतो आहे. होतकरू आणि कलागुणसंपन्न असे नवोदित कलाकार आणि त्यांच्या कलेचा आविष्कार संगीताच्या माध्यमातून आपण अनुभवाला आहे. या कार्यक्रमातून लहानग्यांच्याही कलेची प्रचिती आपल्याला आलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची अनेकदा चर्चा रंगलेली असते. नुकताच हा कार्यक्रम नव्या रूपातून आपल्यासमोर आला आहे. तुम्हाला आठवत असेलच की या मालिकेतून 'मॉनिटर' म्हणून ओळखला जाणारा गोंडस लहान गायकही आपल्या भेटीला आला होता. त्यांच्या गाण्यानं आणि हुशारीनं आपल्या सर्वांचेच निखळ मनोरंजन केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीये का आता हा 'मॉनिटर' मोठा झाला असून या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिनं केले ती आपली लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी हिनं त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 'मॉनिटर' म्हणजे हर्षद नायबळ याचा क्यूटनेस आपण सर्वांनीच एन्जॉय केला आहे. त्याला इवल्याश्या वयातही किती जाण आहे, कितीतरी गोष्टी त्याला माहिती आहेत आणि त्यामुळे आपण त्याच्या निरागसतेचे सतत कौतुक करत आलो आहोत. त्यातच त्यानं 'सुर नवा ध्यास नवा - छोटे सुरवीर' या कार्यक्रमात 'माझी माय' हे गाणं म्हटलं होतं. त्याच्या त्या निरागस स्वरांनी सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली होती. 


हेही वाचा : 'तुम्हाला बोलवलं नाहीये मी', लग्नाआधीच परिणीतीचा चेहरा झाला लाल, नक्की काय बिनसलंय?


स्पृहा जोशीनं इन्टाग्रामवर आपला आणि मॉनिटरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यावेळी हर्षद हा तिच्या मांडीवर बसला आहे आणि स्पृहा त्याचे लाड करताना दिसते आहे. त्यामुळे हा फोटो पाहून चाहत्यांनाही आनंद झाला आहे. तुम्ही पाहू शकता की यात त्याचा लुक हा पुर्णपणे बदलेला वाटतो आहे. 



यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'किती मोठा झालास, काही नाती ही कधीच तुटतं नाहीत'. मॉनिटर या कार्यक्रमानंतर 'पिंकीचा विजय असो' या मालिकेतून दिसला होता. त्यामुळे त्याची तेव्हाही चांगलीच चर्चा होती. त्यानं या कार्यक्रमाच्या सेटवर धम्माल मस्ती केली होती आणि आलेल्या पाहुण्यांची मिमिक्रीही केली होती. त्यातून मध्यंतरी अशोक सराफही या मंचावर आले होते. तेव्हा डॉक्टर धोंड साकारत त्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणले होते.