मुंबई : 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ''सूर्यवंशम'' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र या सिनेमाने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या सिनेमातील एक एक कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याच कारणामुळे हा सिनेमा टीव्हीवर आजही आवर्जून दाखविला जातो. टीव्ही चॅनल सेट मॅक्सवर हा सिनेमा आजही दाखवला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात मुख्य भूमिका ठाकूर भानुप्रतापची असून अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे. मात्र त्यांच्या नातवाला कुणीच विसरलेल नाही. ठाकूर भानुप्रतापला विषारी खीर भरवणारा मुलगा आता मोठा झाला आहे. त्याचं नाव आहे आनंद वर्धन. आंध्रप्रदेशात राहणारा आनंद एक तेलगु अभिनेता आहे. तीन वर्षांचा असताना त्याने मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. आनंदचे आजोबा मोठा गायक होते. दादा बीपी  श्रीनिवास यांच नाव मोठ्या गायकांमध्ये घेतलं जात असे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 3000 हून अधिक गाणी गायली आहे. श्रीनिवास यांना कायम वाटत असे की आपल्या नातवाने अभिनय करावा. 


आनंदचे आजोबा अनेकदा त्याला घेऊन फिल्ममेकर्सकडे जात असे. असंच एकदा दिग्दर्शक गुणशंकर यांनी आनंदला पाहिलं. आणि रामायणम सिनेमात कास्ट करण्याचं ठरवलं. या सिनेमात आनंद वाल्मिकी आणि हनुमानच्या भूमिकेत होता. यानंतर आनंद तेलगु आणि तामिळ भाषेत 'सूर्यवंशम' या सिनेमात काम केलं.


त्यानंतर हा सिनेमा हिंदीत बनवण्यात आला. तेव्हा आनंदचं वय 13 वर्षांचा होता. सूर्यवंशम या सिनेमानंतर तो सिनेसृष्टीपासून दूर झाला. आनंदने आतापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तींसोबत काम केलं आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो फिल्म इंडस्ट्रीपासून जवळपास 12 वर्षे लांब राहिला. खूप वर्षानंतर आता आनंद टॉलीवूडमध्ये एन्ट्री करत आहे.