South Actor Ajit's will House Demolished : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननंतर आता दाक्षिणात्य अभिनेता अजीतच्या घराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजीतच्या घरावर बुलडोजर जाणार आहे. अजीत हा चेन्नईच्या इंजंबक्कम येथे राहतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं त्याचं घर एका वेगळ्या अंदाजात बनवलं होतं. पण एक समस्या आसी असून त्याच्या घराची भींत तोडण्यात येणार आहे. जाणून घेऊया काय आहे कारण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या रिपोर्टनुसार, अजीतच्या घराच्या जवळ असलेला रस्ता हा रुंद करण्यात येणार असून पावसाचे पाणी वाहून जाण्याचे काम सुरू आहे. या कारणामुळे त्याच्या घराची भींत देखील तोडण्यात येणार आहे. जेणेकरून रस्त्याच्या कामात अडचण येणार नाही आणि पावसाळ्यात पाणी वाहून जाणार नाही. तर 2017 मध्ये अजीतनं त्याचं हे घर पूर्ण मॉर्डन टच देत संपूर्ण रेनोवेट केलं होतं. हे पाहता त्यांचं कुटुंब हे कधी भाडेतत्वावर देखील राहिलं आहे. आजच्या दिवसात अजीतच्या घरात लेटेस्ट टेक्नोलॉजी आणि फेसेलिटी आहेत. त्याचं घर लोकप्रिय इंटेरिअर डिझायनरनं डिझाइन केलं होतं. 


आमिरचा बंगल्यावर का बुलढोझर चालणार?


मुंबईतील पॉश एरियामधील आमिरचं घरं होतं. याच घरी आमिर राहत होता. याशिवाय त्याच्याकडे बेस्टा आणि मरीनाच्या अपार्टमेंटमध्ये त्याचे घर आहे. आता ते घर सोडून आमिर हा चेन्नईला शिफ्ट होणार आहे. मनी कंट्रोलनं दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान पुन्हा एकदा त्याचा बंगला तोडून त्याठिकाणी एक नवा बंगला बांधणार आहे. तर या रिपोर्टनुसार, एटमॉस्फियर रियल्टीचे नाव पुढे आले आहे. रिपोर्टनुसार, आमिर खानची आई सध्या आजारी असल्या कारणानं काही दिवस तरी आमिर खान हा तिथेच राहणार आहे अशी माहिती कळते आहे. आमिरविषयी बोलायचे झाले तर तो अखेरीस 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर त्यानं खूप मोठा ब्रेकचं घेतला आहे. आता तो कधी कोणता चित्रपट करणार याची प्रतिक्षा त्याचे चाहते करत आहेत. 


हेही वाचा : 'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं


अजीतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर वर्षेभरात तो एकच चित्रपट करतो. जानेवारी महिन्यात त्याचा  'थिनिवु' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर अभिनयाशिवाय अजीत हा बाईक प्रेमी आहे.