'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

Aishwarya Narkar slams trollers : ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आणि पती अविनाश नारकर यांना रील व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 23, 2023, 06:00 PM IST
'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं title=
(Photo Credit : Social Media)

Aishwarya Narkar slams trollers : मराठमोळ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी 90 चं दशक गाजवलं. त्या काळात त्यांच्या या भूमिका आजही त्यांच्या लक्षात आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांची पन्नाशी ओलांडली असतील तरी त्यांच्यात असलेला उत्साह हा तरुणाईलाच लाजवणारा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचे योगा, डान्सचे रील्स. त्यांचे ही रील्सपाहून सोशल मीडयावर त्यांना ट्रोल देखील करण्यात येते. त्यावर आता नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

ऐश्वर्या यांनी नुकतीच इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. ऐश्वर्या यावेळी म्हणाल्या, "मला असं वाटतं प्रत्येक माणसाला महत्त्व आहे. आपण खरंतर, सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टी शेअर करण्यासाठी, एकमेकांकडून काहीतरी घेण्यासाठी केला पाहिजे. ज्यावेळी मी कुठल्याही गोष्टी पोस्ट करते, रील्स पोस्ट करते, त्याच्या खालची कॅप्शन कोणीच वाचत नाही. जे मला म्हणायचं आहे, ते मी कॅप्शनमध्ये खूप लिहिलेलं असतं. असे काहीतरी विचार देणं, तुमच्या रिलेशनशिपबद्दल काहीतरी बोलणं किंवा आजकाल जे ट्रोल करतात, त्यांचे रिलेशनशिप किती हेल्थी आहेत? काय आहेत? हे आपल्याला या पिढीचं माहित आहे. इतकी वर्ष आम्ही दोघं एकमेकांबरोबर राहतोय, आनंदाने राहतोय, तर त्यानिमित्ताने आम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्टी मला असं वाटतं, आपण आदर केला पाहिजे. सोशल मीडियावरील गोष्टी आवडल्या नाहीत, तर तुम्ही बघू नका किंवा अनफॉलो करा. मला ही करता येत मी ही ब्लॉक करू शकते. पण मला असं होतं की, आपण माणूस म्हणून एकमेकांचा आदर का करू शकतं नाही? आपल्याला नाही आवडलंय तर आपण नाही आवडलं एवढ्या शब्दात म्हणू शकता. पण नाही, तुम्ही त्यांचं वय आणता. त्याच्यात हा मुद्दा कधी आला कळालं नाही की, रील्समुळे पैसे मिळतात. प्लीज खरंच पैसे मिळत असतील तर मला सांगा काय स्कीम आहेत? ती मी घेईन. परंतु असं नाहीये. माणूस प्रत्येक गोष्ट पैशांसाठी नाही करत." 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली

पुढे ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की, "आम्ही पैशांसाठी बारा-बारा तास काम करतो. ती आमची आवड आहे. त्याच्यासाठी या बाकी गोष्टी करत बसण्याच काही कारण नाहीये. बरं इतक्या उथळ विचाराने नका वागू आणि एखाद्याला बोलायचं म्हणून नका बोलू, असं मला वाटतं. त्याने किती फरक पडतो आणि किती फरक पडतं नाही, हा वेगळा मुद्दा आहे. एकमेकांचा आदर करणं ही मला प्राथमिक गोष्ट वाटते. त्यात मला असं वाटतं की, याच्यात आई-वडिलांचा खूप सहभाग आहे. आपण आपल्या मुलाला कसे संस्कार देतो. आपली मुलं कोणाला काय बोलतात, हे सगळे संस्कार आपल्या घरात होतात. त्यामुळे जे विकृत बोलतात, त्यांच्या घरातल्या वातावरणावर मला शंका येते की, आई-वडिलांनी संस्कार केले की नाही केले? किंवा त्यांचे आई-वडील आमच्यासारखे म्हातारे होण्याआधीच वरती गेले? म्हणजे सगळे असे प्रश्न अनुत्तरित राहतात. फक्त माझी एकच विनंती आहे, एकमेकांचा आपण आदर केला पाहिजे. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. प्राणी सुद्धा एकमेकांना छान प्रेमाने वागवतात. पण आपण माणूस आहोत, प्राण्यांच्या वरचढ आपल्याला बुद्धी दिलीये त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायला हवा."