Fahd Fasil Attention Deficit: आवेशम आणि पुष्पा यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दक्षिण भारतीय अभिनेता फहद फासिलच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. वयाच्या 41 व्या वर्षी फहद फसिल याला अटेंशन डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) चे निदान झाले आहे. हे एक न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. जे मेंदूकडून लक्ष, वर्तन आणि आवेग नियंत्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. सामान्यत: लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो पण प्रौढांना देखील हा आजार प्रभावित करू शकतो, असे आढळून आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटेंशन डेफिसिट हा रोग 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सर्वात सामान्य आहे. फहादने एका इव्हेंटमध्ये त्याच्या आजाराबद्दल आणि त्यातून बरे होण्याबद्दल माहिती दिली आहे. केरळमधील कोठामंगलमच्या 'पीस व्हॅली चिल्ड्रन व्हिलेज'च्या उद्घाटनासाठी फहाद आला होता. येथे त्याने डॉक्टरांशी या आजाराच्या उपचाराविषयी चर्चा केली. यावर डॉक्टरांकडूनदेखील महत्वाची माहिती देण्यात आली.  हा आजार लहान वयातच आढळून आला तर तो यातून सहजपणे बरे होता येते. पण फहाद आता  41 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणे सद्यस्थितीला इतके सोपे नसल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.



अटेंशन डेफिसिट या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना खूप कौतुकाची गरज असते, असा एक उपायदेखील डॉक्टरांनी सांगितला आहे. 



दुसरीकडे फहद फसिल याच्या आवेशम या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. ज्यामुळे सध्या तो खूप खूश आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, ॲक्शन सीन, बीजीएम हे सर्व हिट झाले आहेत. आवेशमचे दिग्दर्शन जीतू माधवन यांनी केले असून त्यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. जीतूने मोहनलाल स्टारर मल्याळम फिल्म फ्रँचायझी 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' ची निर्मिती देखील केली आहे.