मुंबई : मेगा स्टार रजनीकांत यांचा आताच रिलीज झालेला 2.0 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमार अशी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा दररोज नवनवीन विक्रम मोडत आहे. अगदी श्रीदेवी ते एमी जॅक्शनसोबत रजनीकांत यांनी काम केलं आहे. पण त्यांची लोकप्रिय अभिनेत्री कोण? हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रजनीकांत यांची लोकप्रिय अभिनेत्री ही बॉलिवूडमधील नसून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील आहे. 70 च्या दशकातील हिट अभिनेत्री जयलक्ष्मी रेड्डी यांच्यासोबत काम करणं रजनीकांत यांना अधिक आवडायचं. धक्कादायक बाब म्हणजे जयलक्ष्मी रेड्डी जेव्हा करिअरच्या शिखरावर होत्या तेव्हा त्यांनी 1980मध्ये आत्महत्या केली. तिच्या या अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला होता. 


एका मुलाखतीत रजनीकांत यांनी सांगितलं होतं की, जयलक्ष्मी रेड्डी यांना फटाफट जयलक्ष्मी या नावाने देखील ओळखले जायचे. मात्र दोघांनी एकत्र फक्त दोनच सिनेमे एकत्र केले होते. रजनीकांत यांनी सांगितल्याप्रमाणे त्या उत्तम अभिनेत्री तर होत्याच पण उत्कृष्ठ व्यक्ती देखील होत्या.