`व्हॅनिटीमध्ये हिडन कॅमेरा लपवून अभिनेत्रींचे...`, दाक्षिणात्य अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Radhika Sarathkumar Malayalam Film Industry : चित्रपटाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये हिडन कॅमेरा अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा...
Radhika Sarathkumar Malayalam Film Industry : हेमा कमेटीची रिपोर्ट समोर आल्यानंतर आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत मोठा वाद सुरु आहे. आता त्यात लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकरण समोर आले आहेत. या सगळ्यात दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरतकुमारनं धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की चित्रपटाच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये हिडन कॅमेरा लावण्यात आले होते आणि कपडे बदलताना त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात यायचे.
Asianet News ला दिलेल्या मुलाखतीत राधिका सरतकुमार यांनी या घटनेचा खुलासा केला होता. त्याच्यानंतर ते खूप घाबरले होते. त्यांनी सांगितलं की 'जेव्हा मी केरळमध्ये एका सेटवर होती तेव्हा मला तिथे पाहिलं की काही लोकं कोणत्या तरी गोष्टीवर हसत आहेत. तिथून जाताना मला हे जाणवलं की सगळे एक व्हिडीओ पाहतायत. मी तिथून एका क्रु मेंबरला बोलावलं आणि त्याला विचारलं की ते काय पाहतायत. त्यानं मला सांगितलं की व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरा होता आणि महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. मला सांगण्यात आलं की तुम्हाला फक्त आर्टिस्टचं नाव टाइप करायचं आहे आणि तुम्हाला तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ मिळेल.'
राधिका यांनी सांगितलं की या घटनेनंतर त्या इतक्या घाबरल्या आणि त्या घटनेनंतर त्यांनी कपडे बदलण्यासाठी हॉटेल रूमचा वापर करण्यास सुरुवात केली. त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खूप सतर्क राहतात. राधिका सरतकुमारनं पुढे सांगितलं की 'खूप जास्त वाईट होतंय. घटनेनंतर मी इतक फीमेल आर्टिस्टला व्हॅनिटी व्हॅनमध्ये लपवण्यात आलेल्या कॅमेऱ्याविषयी सांगितलं. घटनेनंतर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला सुद्धा घाबरू लागले होते. ती व्हॅनिटी व्हॅन आमच्यासाठी कपडे बदलणं, आराम करणं किंवा जेवण करण्यासाठी असलेली एक पर्सनल स्पेस आहे.'
राधिका यांनी पुढे सांगितलं, 'मी व्हॅनमध्ये महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ पाहिले आहे. मी सांगितलं की ही मुळीच योग्य नाही. मी व्हॅन टीमला सांगितलं की जर मला व्हॅनमध्ये कॅमेरा मिळाला तर मी त्यांना चप्पलनं मारेन. मी खूप रागात होते. मी म्हटलं मला सुरक्षित राहायाचं आहे आणि मला व्हॅन मुळीच नकोय. त्यावर मला त्यांनी सांगितलं की ते यावर विचार करतील.'
हेही वाचा : 'आमच्या कुटुंबात एकमेकांना मदत करणं...', वडिलांनी लॉन्च न करण्यावर वरुन धवननं सौडलं मौन
राधिका सरतकुमार यांनी ‘थेरी’, ‘चंद्रमुखी’, ‘पोक्किरी राजा’, ‘चिट्ठी’ आणि ‘नल्लावनुक्कु नल्लवन’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याशिवाय ‘हिम्मतवाला’, ‘लाल बादशाह’, ‘नसीब अपना-अपना’ आणि ‘मेरा पति सिर्फ मेरा है’ सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.