साई पल्लवीचं मोठं धाडस; काश्मिरी पंडित मुद्द्यावर म्हणाली....
... जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्री काश्मीर मुद्द्यावर तिचं परखड मत मांडते
मुंबई : धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसक घटनांवर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आघाडीची दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी, हिनंसुद्धा अशा हिंस्र घटनांची तीव्र शब्दांत निंदा करत आपलं परखत मत मांडलं आहे. (south Actress sai pallavi on kashmiri pandit religious conflict)
एका मुलाखतीदरम्यान साई पल्लवीनं तिची भूमिका स्पष्ट केली. तिचं वक्तव्य पाहता, अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीकेची झोड उठवली.
काय म्हणाली साई?
'द काश्मीर फाईल्स' चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की त्यावेळी कशा प्रकारे काश्मिरी पंडितांवर निशाणा साधला गेला होता. तुम्ही या घटनेकडे धार्मिक संघर्षाच्या दृष्टीतून पाहत असाल तर हल्लीच घडलेली घटना पाहा. जिथं गायी घेऊन जाणाऱ्या एका वाहनाच्या मुस्लीम चालकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याला 'जय श्रीराम'चे नारे द्यायला भाग पाडलं होतं. या दोन्ही घटनांमध्ये अंतर आहे हे ओळखा, असं म्हणत साईनं काही गोष्टी इथं अधोरेखित केल्या.
राजकिय भूमिकांविषयीचा प्रश्न विचारताच आपलं संगोपन एका तटस्थ कुटुंबात झाल्यामुळं लहगानपणापासूनच एक चांगली व्यक्ती होण्याची शिकवण मला मिळाल्याचं ती म्हणाली.
संकटात असणाऱ्यांची आणि पीडितांची चिंता करत त्यांना संरक्षण देण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचं सांगत तिनं जरा स्पष्टच शब्दांत आपल्या मनातील चीड सौम्य शब्दांत बोलून दाखवली.
साईच्या या वक्तव्यानंतर तिला सर्वच स्तरांतून कौतुकाची थाप मिळाली असं नाही. काहींनी तिच्यावर टीकाही केली. पण, साई मात्र या सर्व गोष्टींना मेग सोडत केव्हाचीच पुढे निघून गेली आहे.