मुंबई : सुप्रसिद्ध साऊथ स्टार अल्लू अर्जुनची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे. 'पुष्पा: द राइज' हा सिनेमा आल्यानंतर त्याची लोकप्रियता देशातच नाही तर परदेशातही वाढली आहे. अल्लू अर्जुनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जे पडद्यावर हिट ठरले आहेत. तो साऊथमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनला खूप लग्झरी लाइफ जगायला आवडते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुनचं नेटवर्थ
 मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 47 मिलियन म्हणजेच जवळपास 350 कोटी रुपये इकती आहे. एका चित्रपटासाठी तो 14 ते 15 कोटी रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने 'पुष्पा'च्या सीक्वलसाठी 100 कोटी रुपये ही मोठी रक्कम आकारली आहे.


अभिनेता आलिशान बंगल्यात राहतो
अल्लू अर्जुन हैद्राबादमध्ये जुबली हिल्स येथे एका आलिशान बंगल्यात राहतो. 8000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेलं त्याचं घर अतिशय सुंदर डिझाइन केलेलं आहे. याशिवाय त्यांच्या घरात एक प्रायव्हेट पूल देखील आहे. अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि दोन मुलांसह या घरात राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार या घराची किंमत 100 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर, अभिनेत्याने मुंबईत 2 बीएचके फ्लॅट देखील खरेदी केला आहे.


Luxurious कारचा आहे शॉक
अल्लू अर्जुनला कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे रेंज रोव्हर, हमर एच2, रेंज रोव्हर वोग, जॅग्वार एक्सजेएल, वॉल्वो एक्ससी 90 टी8 एक्सीलेंस  सारख्या महागड्या गाड्या आहेत. त्यांच्या गाड्या कोट्यावधीत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे स्वतःची एक खाजगी जेट आणि व्हॅनिटी व्हॅन आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत सुमारे 7 कोटी रुपये आहे. ज्याला त्याने 'द फाल्कन' असे नाव दिले आहे.