मॉस्को : एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या Baahubali 2 'बाहुबली' या चित्रपटाने भारतील चित्रपटविश्वात एक वेगळं पर्व आणलं. भव्यतेच्या परिसीमा ओलांडणाऱ्या या चित्रपटाची लोकप्रिया आजही कायम आहे. अशा या चित्रपटाचे दोन्ही भाग लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. कलाकार आणि कलाविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या चित्रपटाने आता आणखी एक मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे. तोसुद्धा अगदी सातासमुद्रापार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती या कलारांच्या मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने थेट रशियातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 'बाहुबली- द कन्क्ल्युजन' या २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं रशियन भाषेतील ध्वनीमुद्रीत आणि तितकंच वेगळं रुप गुरुवारी रशियातील वाहिनीवर प्रक्षेपित करण्यात आलं. 


रशियन दुतावासानं ट्विटरवर चित्रपटातील एका दृश्यावेळचा काही सेकंदांचा व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये बाहुबली आणि राजमाता शिवगामी हे चक्क रशियातील भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. आता ते काय बोलत आहेत हे कळत नसलं, तरीही हा चित्रपट भारतीयांसाठी इतका सवयीचा झाला आहे की फक्त दृश्यानेच संवादही आपोआपच लक्षात येत आहेत. 


मुख्य म्हणजे रशियातील घरघरात पोहोचलेल्या या चित्रपटाच्या यशात लॉकडाऊनच्या या काळातही खऱ्या अर्थाने भर पडली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 



रेल्वे रुळावर आणण्यासाठीच्या हालचाली सुरु; आरक्षण प्रक्रियेत बदल


 


'अमरेंद्र बाहुबली' म्हणजे प्रभास, 'देवसेना' म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शेट्टी, 'भल्लालदेव' म्हणजेच अभिनेता राणा डग्गुबती, 'राजमाता शिवगामी' म्हणजेच रम्या कृष्णन असे कलाकार आणि त्यांच्या भूमिका या चित्रपटातून पाहता आल्या होत्या. चित्रपटाच्या निमित्तानं 'कटप्पा' या पात्रालाही विशेष लोकप्रियता मिळाली.