सुपरस्टार अभिनेत्याकडून आईला संपूर्ण थिएटरच बर्थडे गिफ्ट
हा तर नाद खुळा....
मुंबई : जीवनात कधीही आणि कितीही पुढे गेलं तरीही काही व्यक्तींना विसरुन चालत नाही. याच व्यक्तींमध्ये एक स्थान असतं ते म्हणजे आईचं. जन्माला घालण्यापासून ते अगदी संस्कार देऊन मोठं करेपर्यंत प्रत्येक वेळी आई आपल्या बाळाला सांभाळून घेत असते. तिच्या या उपकारांची परतफेड करणं निव्वळ अशक्यच आहे. पण, तरीही एक लहानसा प्रयत्न करत सुपरस्टार अभिनेत्यानं त्याच्या आईला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
फक्त शुभेच्छांपुरताच सीमीत न राहता त्यानं आईला या खास दिवशी एक खास भेटही दिली आहे. ही भेट अशी आहे, जी या अभिनेत्यासाठी जितकी महत्त्वाची तितकीच ती आईच्याही हृदयाच्या जवळची. जिथून आईला अभिनेत्याची कधीही भेट घेता येईल.
ही भेट आहे एका मल्टीप्लेक्स थिएटरची आणि ही भेट देणारा अभिनेता आहे विजय देवेरकोंडा. विजयनं त्याच्या आईला भेट म्हणून त्याचं नवंकोरं Asian Vijay Devarakonda Cinemas(AVD) भेट म्हणून देऊ केलं आहे.
'वाढदिवसाच्या शुभेच्छा मम्मुलू..... हे तुझ्यासाठी. तू व्यायाम करत स्वत:ची काळजी घेतलीस आणि निरोगी राहिलीस तर मीसुद्धा खूप मेहनत घेऊन तुला अशाच खुप साऱ्या आठवणी देईन', असं विजयनं आईचा मल्टीप्लेक्समधील फोटो पोस्ट करत लिहिलं.