श्रीमंती, प्रसिद्धी सर्वकाही असुनही सुपरस्टार अभिनेत्याच्या पत्नीचा `आई` न होण्याचा निर्णय; कारण देत मोठी बाजू समोर
अनेकांनाच ही जोडी बाळाचं स्वागत केव्हा करणार हा प्रश्नही पडला.
मुंबई : तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्यानं कायमच त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम केलं. इथे तरुणींचं हृदय त्याच्यासाठी धडधडत असताना त्यानं मात्र आपल्या आयुष्यभरासाठीच्या जोडीदाराची निवड केली.
पैसा, प्रसिद्धी आणि आनंदी कुटुंब हे सारंकाही या अभिनेत्याच्या आणि त्याच्या पत्नीच्याही वाट्याला आलं. पण, वडील होण्याचं सुख मात्र तो अनुभवू शकला नाही. हा अभिनेता म्हणजे राम चरण. साधारण 10 वर्षांपूर्वी त्यानं उपासना कामिनेनी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. पण, तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या नात्यातून गोड बातमी मात्र मिळाली नाही.
अनेकांनाच ही जोडी बाळाचं स्वागत केव्हा करणार हा प्रश्नही पडला. पण, आता मात्र हा प्रश्न पुन्हा विचारला जाणार नाही. कारण खुद्द उपासनानंच याबाबतचं उत्तर देत आपल्याला मुलं नकोयत असं म्हटलं.
Ram Charan ची पत्नी Upasana Kamineni हल्लीच अध्यात्मिक गुरू सदगुरुंकडे पोहोचली होती. तिथं तिनं आपण लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी बाळाच्या जन्माचा प्रयत्न करत नसल्याचं स्पष्ट केलं. यापूर्वी राम चरण यानंही एका मुलाखतीमध्ये आपण आणि पत्नी उपासना बाळाला जन्म देऊ इच्छित नसल्याचं सांगितलं होतं. (South indian Actor ram charan wife upasana dont want to become a mother know the reason )
सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा असल्यामुळं आपल्यावर प्रेक्षकांना आनंदात ठेवण्याची जबाबदारी आहे. बाळाच्या जन्मानंतर आपलं लक्ष विचलित होऊ शकतं, असं कारण त्यानं पुढे केलं होतं. उपासनानंही आयुष्यात काही लक्ष्य निर्धारित केली आहेत. त्यामुळं तीसुद्धा ही जबाबदाली स्वीकारू इच्छित नसल्याचं त्यानं सांगितलं होतं.
जीवनातील अमुक एका टप्प्यावर आल्यानंतर जिथे अनेक महिला मातृत्त्वाची चाहूल लागण्याच्या प्रतीक्षेत असतात, तिथेच उपासना मात्र तिचा वेगळा दृष्टीकोन सर्वांसमोर ठेवताना दिसत आहे.