मुंबई : कलाजगताला हादरवणारी बातमी सध्या समोर आली आहे. आपल्यासोबत एका लोकप्रिय अभिनेत्यानं वारंवार चुकीची कृत्य केल्याचं म्हणत एका महिलेनं काही दिवसांपूर्वी पोलिसांत धाव घेतली. ही महिलासुद्धा एक अभिनेत्रीच असल्याचं कळत आहे. पण, मुद्दा असा की हा अभिनेताच आता या प्रकरणात आपणच पीडित असल्याचं म्हणताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मल्ल्याळम चित्रपटसृष्टी गाजवणारा हा अभिनेता आहे, विजय बाबू (Vijay Babu). एका सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून त्यानं आपणच बऱ्याच गोष्टी सहन केल्याचं स्पष्ट केलं. 


सदर प्रकरणी अभिनेत्यानं लाईव्हमध्ये महिलेचं नाव घेत तिनं केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं सांगितलं. एर्नाकुलम येथे असणाऱ्या फ्लॅटवर बोलवून विजयनं आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप केले होते. 


आपण असं काहीच केलं नसल्याचं म्हणत विजय सदर प्रकरणी होणारा मनस्ताप पाहता ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचं वक्तव्य केलं. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी तक्रार करुनही अभिनेत्याची कोणत्याही प्रकारची चैकशी न झाल्यामुळं अभिनेत्रीनं नाराजीचाही सूर आळवला आहे. 



काम देण्याच्या बहाण्यानं अभिनेत्रींचं शोषण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. किंबहुना झगमगणाऱ्या या विश्वाचा हा काळवंडलेला चेहरा कायमच काहीजणींच्या नशिबी आला आहे. अनेजकणींनी यामुळं काही चुकीचे निर्णयही घेतले आहेत. 


आता मुद्दा असा, की विजय बाबूविरोधातले आरोप पाहता त्याच्यावर काही कारवाी होणार की, या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळणार ?