FINALLY : क्रिकेटरला डेट करण्याविषयी अनुष्काने सोडलं मौन
येत्या काळात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं.
मुंबई : 'बाहुबली' या चित्रपटातून झळकल्यानंतर बहुचर्चित अशी प्रभास आणि अनुष्काची जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याच्याच चर्चांनी जोर धरला. या चर्चा शमत नाहीत तोच या वर्षाच्या सुरुवातीपासूनच Anushka Shetty अनुष्का शेट्टी हिच्या जीवनातील अशाच एका माहितीने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. दाक्षिण भारतात नावाजलेली ही अभिनेत्री कोणा अभिनेत्याच्या नव्हे तर एका क्रिकेचपटूच्या प्रेमात असून, येत्या काळात ते लग्न करणार असल्याचं म्हटलं गेलं.
भारताच्या उत्तरेकडील राज्यातील या क्रिकेटपटूशी अनुष्काचं नातं पाहता पाहता चर्चेचा विषय ठरु लागलं. या चर्चा इथवर पोहोचल्या की चक्क अनुष्का 'त्या' खेळाडूशी लग्न करणार असल्याचंही म्हटलं गेलं. पण, हा खेळाडू नेमका कोण, याविषयी मात्र गोपनियता पाळली गेली.
आपल्या वैयक्तिक जीवनाविषयीच्या या सर्व गोष्टींविषयी आता खुद्द अनुष्कानेच मौन सोडलं आहे. 'तामिळ मुरासू'च्या वृत्तानुसार एकदा लोकांनी ती कोणा एका व्यक्तीच्या प्रेमात असल्याचं म्हटलं. ज्यानंतर लग्नाच्याही चर्चांनी जोर धरला गेल्याचं म्हणत या सर्व अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. शिवाय काहीही बोलण्यापूर्वी किमान त्याविषयी खात्री करुन घेण्याचा सूरही तिने आळवला.
लग्नाविषयी बरंच बोललं गेलं, बोललं जाईलही. किंबहुना काही माध्यमांच्या वृत्तानुसार ती विवाहितही आहे, असं म्हणत आपल्या लग्नाचा निर्णय हा पालकांवरच सोडल्याचं अनुष्काने या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं.
पाहा : देवाब्राह्मणाच्या नव्हे, संविधानाच्या साक्षीने अभिनेत्याने बांधली लग्नगाठ
अनुष्काने तिच्या खासगी आयुष्याविषयी उघड केलेली ही माहिती पाहता किमान यापुढे तर कोणा व्यक्तीशी तिचं नाव जोडलं जाणार नाही हे खरं. शिवाय आता खुद्द अनुष्काच ती कधी, केव्हा आणि कोणासोबत लग्नबंधनात अडकणार हे सांगते याबाबतची उत्सुकता असेल.