मुंबई : जीवनाचा प्रवास प्रत्येकालाच चांगले दिवस दाखवतो असं, नाही. पण, वाईट दिवसही दाखवत नाही हेसुद्धा तितकंच खरं. आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगी समतोल राखता आला की या बऱ्या- वाईटाच्या चक्रातही तुम्हाला अगदी सहज समतोल राखता येईल. सध्या अभिनेत्री समांथा प्रभू (Samantha Prabhu) अशाच वळणावरून जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वीच समंथाच्या वैवाहिक जीवनात वादळ आलं होतं. अभिनेता नागा चैतन्य याच्याशी असणारं तिचं चार वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं आणि एका क्षणात गोष्टींना भलतं वळण लागलं. 



समंथाची कारकीर्द चांगलीच वेगात असतानाच हे सर्व घडलं. 'द फॅमिली मॅन 2'या सीरिजमध्ये तिनं आव्हानात्मक भूमिका साकारली. इतकंच नव्हे, तर इंटिमेट सीनही साकारला. 


आतापर्यंत समंथानं इतका इंटिमेट सीन दिला नव्हता. त्यामुळं सर्वांसाठी हा एक धक्काच होता. किंबहुना तिच्या कुटुंबातही यामुळं वादळ निर्माण झालं. 



रातोरात समंथा या सीनमुळं प्रसिद्धीझोतात आली, पण तिच्या आयुष्यात मात्र याच सीननं वावटळ आणलं. समंथानं कुटुंबाची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया अक्किनेनी कुटुंबाकडून देण्यात आली. किंबहुना त्यांनी हे शब्द मागेही घेतले. पण, तरीही त्यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र आताही थांबलेली नाही.