Samantha Ruth Prabhu In Trouble: दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या चर्चेत आहे. मात्र या चर्चेचं कारण तिचा कोणताही चित्रपट अथवा वेब सिरीज नाही तर एक सोशल मीडिया पोस्ट आहे. सामंथाच्या या पोस्टमुळे नवीन वादाला तोंड फुटलं असून अभिनेत्रीवर चौफेर टीका होताना दिसत आहे. हे प्रकरण एवढं वाढलं की सामंथाला या प्रकरणी खुलासा करावा लागला. नेमकं घडलं काय आपण जाणून घेऊयात.


माजी बॅटमिंटनपटू संतापली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, सामंथाने काही दिवसांपूर्वी स्वत:चा एक फोटो शेअर केला. व्हायरल इन्फेक्शन झाल्याने डॉक्टरांनी दिला हायड्रोजन पॅरॉक्साइड नेबुलाइजेशनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र समंथाने केलेल्या या पोस्टवरुन भारताची माजी बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टा चांगलीच संतापली आहे. तिने सोशल मीडियावरुनच सामंथाला झापलं आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपलं म्हणणं मांडताना ज्वालाने सामंथा किंवा तिचे डॉक्टर या आरोग्यविषय सल्ल्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.


तो डॉक्टर मृत्यूची जबाबदारी घेणार का?


"मोठ्या संख्येनं चाहते फॉलोअर्स असलेल्या आणि लोकांना वेगवेगळे औषधोपचार लिहून देणाऱ्या अभिनेत्रीला  माझा एकच प्रश्न आहे. मला ठाऊक आहे की तिचा हेतू मदत करण्याचा आहे. मात्र या गोष्टींचा सकारात्मक परिणाम नाही झाला आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर तुम्ही याची जबाबदारी घेणार का? तुम्ही ज्या डॉक्टरला टॅग केलं आहे तो या मृत्यूची जबाबदारी घेईल का?" असा सवाल ज्वालाने उपस्थित केला आहे.


नेमकं प्रकरण काय?


सामंथाने काही दिवसांपूर्वी आपला एक फोटो शेअर करताना व्हायरल इन्फेक्शनवर उपचार म्हणून डॉक्टरांनी हायड्रोजन पॅरॉक्साइड नेबुलाइजेशनचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचं सांगितलं होतं. तिने शेअर केलेल्या फोटोत ती दम्याच्या पंपासारख्या यंत्राच्या माध्यमातून श्वास घेताना दिसत आहे.



समंथाने यासंदर्भातील एक स्पष्टीकरणाची लांबलचक पोस्ट इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे.



अभिनेत्याने घेतली सामंथाची बाजू


याचदरम्यान तेलगु-तमिळ अभिनेता दिग्दर्शक राहुल रविंद्रनने 'द लिव्हर डॉक'ला विनंती केली की या डॉक्टरबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला. अभिनेत्री सामंथाच्या मागे लागण्याऐवजी तिला हा सल्ला देणाऱ्या डॉक्टरशी चर्चा होणं गरजेचं असल्याचं राहुलनं म्हटलं आहे. "तुम्ही तिच्या मागे लागण्याऐवजी हा सल्ला देणाऱ्या डॉक्टरबरोबर चर्चा केली तर अधिक फायदा होईल," असं राहुलने म्हटलं आहे.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)