`या` प्रसिद्ध अभिनेत्रीनेही केला कास्टिंग काऊचचा सामना!
चित्रपटसृष्टीतीच्या झगमगत्या दुनियेतील कास्टिंग काऊचचे प्रकरण हळूहळू समोर येऊ लागले आहे.
नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीतीच्या झगमगत्या दुनियेतील कास्टिंग काऊचचे प्रकरण हळूहळू समोर येऊ लागले आहे. अनेक अभिनेत्रींनी आपले अनुभव याबद्दलचे अनुभव शेअर केले. साऊथ इंडियन चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हरिहरन हीने देखील आपला अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, मी देखील कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. एका कन्नड चित्रपटाच्या कास्टिंगसाठी गेले होते आणि तिथे मला अतिशय कठीण परिस्थितीत टाकण्यात आले. चित्रपटाचे ५ निर्माते होते आणि एकाने मला काम देण्यास सांगितले होते. ते कोणत्याही प्रकारे माझा वापर करू शकत होते.
कास्टिंग काऊचवर मोकळेपणाने बोलली श्रुती
श्रुतीने या गोष्टीचा खुलासा इंडिया टुडे कॉन्क्लेव साऊथ 2018 मध्ये केला आहे. श्रुतीने मोकळेपणाने सांगितले की, समाज्यात प्रचलित भावनांच्या आधारावर चित्रपटात स्त्री ची व्यक्तिरेखा दाखवली जाते. अधितर चित्रपटात मुलींना एका वस्तूप्रमाणे काम करावे लागते. ती सुंदर, सेक्सी दिसायला हवी, म्हणजे चित्रपट चालण्याची शक्यता अधिक असते.
गप्प राहणे हा पर्याय असू शकत नाही
कास्टिंग काऊचबद्दल बोलताना श्रुतीने सांगितले की, महिलांनी गप्प राहणे हा पर्याय असू शकत नाही. महिलांसाठी पब्लिक स्पेस उपलब्ध नाही कारण समाज पुरूषप्रधान आहे. अधिकतर मुलींनी कास्टिंग काऊचचा सामना नाही बोलून करायला हवा. यासाठी फक्त पुरूषांना जबाबदार धरणे योग्य नाही. कास्टिंग काऊचमुळे तुम्हाला पहिली संधी जरूर मिळेल पण त्या आ्धारे तुम्ही तुमचे करिअर करू नाही शकणार.