चेन्नई :  Coronavirusचा वाढता प्रादुर्भाव पाहता, देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना व्हायरसची लागण, संसर्ग टाळण्यासाठी म्हणून नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि अत्यायवश्यक सेवा वगळता या निर्णयाअंतर्गत इतर सर्व व्यवहार ठप्प झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या याच काळात अनेक ठिकाणी एका समस्येने डोकं वर काढत मात्र सर्वांना धक्काच दिला. मद्य विक्री करणारी अर्थाच दारुची दुकानं बंद असल्यामुळे मद्याच्या आहारी गेलेल्या अनेकांनी याला पर्यायी द्रव्यांचं प्राशन केल्याच्या घटनाही  पाहायला मिळाल्या. मुख्य म्हणजे असं करणं कित्येकांच्या जीवावरही बेतलं आहे. 


सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेत्री मनोरमा यांचा मुलगा भूपती यानेही मद्य मिळालं नसल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेतल्या. ज्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भूपतीला मद्याचं व्यसन असल्याचं म्हटलं गेलं. शिवाय या दरम्याच्या काळात मद्य मिळालं नसल्यामुळे त्याला नैराश्याचाही सामना करावा लागत होता. अखेर त्याने झोपेच्या गोळ्यांचं सेवन केलं. 


 


प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे त्याला उपचारांसाठी लगेचच चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या या कृतीमुळे कलाविश्वात अनेकांना धक्काच बसला आहे. दरम्यान, मनोरमा किंवा त्यांच्या  कुटुंबीयांकडून मात्र या वृत्ताविषयी कोणतीही अधिकृतमाहिती देण्यात आलेली नाही.