मुंबई : सहसा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असला की, त्याला शुभेच्छा दिल्या जातात. त्याचे फोटोही शेअर केले जातात. पण, कोणा एका व्यक्तीचा वाढदिवस असेल आणि तेव्हात तुम्ही त्याच्यापुढं हात टेकले असं म्हणाल का? नाही ना? पण, असं झालंय. तेसुद्धा एका सेलिब्रिटीसोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटविश्वात दमदार परफॉर्मन्स देत आणि एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एका सुपस्टार अभिनेत्याच्या मुलानं केलेली पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 


'मी आता हात टेकले...', असं म्हणत लेकानं त्याच्या सुपरस्टार वडिलांसोबतचे फोटो शेअर केले. हे कॅप्शन यासाठी खास होतं की, वयाच्या सत्तरीमध्येही आपल्या वडिलांचा अंदाज आपल्याला लाजवेल असाच आहे या भावनेनं त्यानं ते लिहिलं होतं. हे कॅप्शन लिहित फोटो पोस्ट करणारा हा अभिनेता आहे, दुल्कर सलमान. आणि सत्तरावा वाढदिवस साजरा करणारे हे सुपरस्टार अभिनेते आहेत त्याचे वडील, ममूथी. 


आम्ही तुमच्या कुटुंबाचाच एक भाग आहोत, त्यासाठी आम्ही स्वत:ला फारच नशीबवान समजतो. तुम्हाला वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा, म्हणत दुल्कर सलमान यानं वाढत्या वयाच्या आकड्यालाही लाजवणाऱ्या ममूथी यांच्यावर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. 



दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळासोबतच जागतिक स्तरावरही ममूथी यांची लोकप्रियता हेवा वाटेल अशीच आहे. 1971 मध्ये Anubhavangal Paalichakal या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यांनी जवळपास 400 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मल्याळम चित्रपटांसोबतच त्यांनी तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. विविधभाषी चित्रपटांमध्ये काम करत ममूथी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आणि मोठा चाहतावर्ग निर्माण केला.