मुंबई : बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेता सिद्धार्थचं ट्विट वादात सापडलंय. सायना नेहवालने पंजाबमधील भटिंडा येथील उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला 20 मिनिटं थांबवल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती कारण गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आंदोलकांनी रास्ता रोको केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायना नेहवालच्या या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट करून असं काही लिहिलं आहे की, सगळेजण त्याचा निषेध करत आहेत आणि  त्याच्याविरोधात एफआयआरची मागणी करण्यात आली आहे. तसं, सिद्धार्थने काही बोलून वादाच्या भोवऱ्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी तो त्याच्या एक्ससोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आला होता आणि त्याने तिला टार्गेटही केलं होतं आणि ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साऊथची सुपरस्टार सामंथा रुथ प्रभू होती. जिच्यासोबत त्याचं उघडपणे अफेअर होतं.


सामंथा रुथ प्रभुसोबत होतं अफेअर
सिद्धार्थ नागार्जुनची एक्स सून म्हणजेच समंथा रुथ प्रभूसोबत  रिलेशनशिपमध्ये होता. हे दोघं अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते आणि दोघेही एकमेकांसाठी इतके गंभीर होते की, ते लिव्ह इनमध्येही राहू लागले. मात्र, कोणत्याही टप्प्यावर पोहोचण्याआधीच दोघांनी एकमेकांपासून आपले मार्ग वेगळे केले. या कपलच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना खूप वाईट वाटलं होतं.


चिटर वालं ट्वीट झालं होतं वायरल
दाक्षिणात्य कलाकार समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी त्यांच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. त्यानंतर लोकांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. याचवेळी सामंथाचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता सिद्धार्थनेही सोशल मीडियावर काहीतरी असं लिहिलं, ज्यानंतर एकच खळबळ माजली. खरं तर, समंथा-नागा चैतन्यच्या विभक्त होण्याच्या घोषणेनंतर लगेचच, सिद्धार्थने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं की, मी माझ्या शाळेतील शिक्षकांकडून शिकलेल्या जीवनातील एक धडा म्हणजे फसवणूक करणारे कधीही शांततेत राहू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटत?



अभिनेत्याच्या या ट्विटनंतर लोकांनी त्याला खडे बोल सुनावलं होतं आणि कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नके असा सल्लाही दिला होता.  मात्र, याबाबत स्पष्टीकरण देत अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला, 'मी नेहमीच सोशल मीडियाखूप सक्रिय असतो. मी रोज ट्विट करतो. लोकांनी माझ्या ट्विटला कोणताही वेगळा अर्थ जोडला असेल तर ती लोकांची मर्जी.