Pushpa 2 Trailer Launch: पुष्पा फ्लॉवर नाही तर वाईल्डफायर; `पुष्पा 2` चा धमाकेदार ट्रेलर अखेर रिलीज
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या `पुष्पा 2` चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Pushpa 2 Trailer Launch: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. पाटणा येथील गांधी मैदानावर हा सोहळा पार पडला. ट्रेलर रिलीज सोहळ्याला प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी होती. 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी 'पुष्पा 2' हा एक चित्रपट आहे. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.
'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नुकताच 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये 'पुष्पा'च्या प्रचंड यशानंतर अल्लू अर्जुन ग्लोबल स्टार बनला. तेलुगू चित्रपटसृष्टीबाहेर त्याला एवढी लोकप्रियता मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आज पाटणा येथील गांधी मैदानावर 'पुष्पा 2' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचे हजारो चाहते जमले होते. जल्लोष आणि लोकांची संख्या पाहून पाटणा प्रशासनाने कार्यक्रमापूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती. संध्याकाळी 6 वाजता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
रिलीजपूर्वीच या चित्रपटाने केली प्रचंड कमाई
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 1000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ज्यामध्ये 640 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाचे थिएटर राईट्सचे हक्क विकून केली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे संगीत हक्क 65 कोटी तर सॅटलाईट अधिकार 85 कोटी रुपयांना विकले आहेत. त्याचबरोबर चित्रपटाचे नॉन-थिएटर राइट्समधून या चित्रपटाने 425 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
अल्लू अर्जूनसोबत दिसणार रश्मिका मंदाना
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांव्यतिरिक्त कन्नड, मल्याळम आणि बंगाली या भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.