Rajinikanth In Bus Depot Video : असं म्हणतात की परिस्थिती चांगली असो किंवा वाईट, ती कधीतरी बदलतेच. मुळात जगण्याच्या या प्रवासात आपल्याला सर्वच दिवस पाहावे लागतात. सर्व प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मोठमोठ्या व्यक्तींनाही हा संघर्ष चुकलेला नाही. विश्वास बसत नाहीये? रजनीकांत यांचंच उदाहरण घ्या. कधी एकेकाळी बस कंडक्टर म्हणून नोकरी करणारे आणि हातात तुटपुंजी रक्कम मिळणारे रजनीकांत आज अनेकांच्याच मनावर राज्य करतात यावरून हे सिद्ध होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याआधी रजनीकांत एक सर्वसामान्य नोकरी करत होते. इथूनच त्यांच्या आयुष्याची खरी सुरुवात झाली होती. त्यामुळं आज पैसा, श्रीमंती, प्रसिद्धी आणि समाजाकडून मिळणारा मानसन्मान सर्वकाही असूनही ते आपला भूतकाळ मात्र विसरलेले नाहीत. रजनीकांत यांच्या कृतीतून हेच सिद्ध होत आहे. 


...आणि बस डेपोत अवतरले थलायवा 


मंगळवारी जुन्या आठवणींमध्ये रमत रजनीकांत यांनी बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थात बीएमटीसी बस स्थानकात पोहोचले. एक काळ असा होता जेव्हा इथंच ते कंडक्टर म्हणून काम करत होते. 




रजनीकांत यांनी अचानकच ठरवलं आणि ते इथं आले, हे पाहताच तिथं असणाऱ्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना विश्वासच बसेना. यावेळी त्यांना पाहताच अनेकांची धावपळ, घाई झाली. त्यांना बसवण्यासाठी खुर्ची, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठीची उत्सुकता असंच एकंदर चित्र आणि त्या भाबड्या चाहत्यांची लाखात एक प्रतिक्रिया यावेळी रजनीकां यांनाही सुखद अनुभव देऊन गेली असणार यात शंकाच नाही.  


हेसुद्धा वाचा : नसीरुद्दीनची पत्नी असूनही रत्ना पाठक यांनी स्वीकारला नाही इस्लाम, सासूबाईंना कळलं आणि...



भूतकाळात पाहताना... 


रजनीकांत म्हणजे तेव्हाचे शिवाजीराव गायकवाड शहरातील बससेवेमध्ये कंडक्टर म्हणून काम करत असतानाच दिग्गज तामिळ चित्रपट दिग्दर्शक के. बालचंद्र यांनी त्यांना पाहिलं आणि त्यानंतर त्यांनीच कंडक्टर असणाऱ्या शिवाजीराव गायकवाड यांचा रजनीकांत करत कलाजगतामध्ये त्यांना पहिली संधी दिली. 1975 मध्ये त्यांचा 'Aboorva Ragangal' हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये कमल हसन यांनीही या चित्रपटात भूमिका साकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार रजनीकांत यांनी आयुष्यातील मोठा काळ बंगळुरू येथे व्यतीत केला. इथं ते वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत राहिले आणि त्यानंतर कलाजगतात नशीब आजमावण्यासाठी त्यांनी चेन्नईची वाट धरली त्याआधीच ते इथं कंडक्टर म्हणून सेवेत होते.