एक, दोन नही तर तब्बल 20 कोटी रूपयांच्या घरात राहतो `हा` सुपरस्टार
अभिनेत्याचं 20 कोटी रूपयांचं भव्य घर, पाहा फोटो
मुंबई : सेलिब्रिटी फक्त त्यांच्या चित्रपट आणि अफेअर्समुळे चर्चेत नसतात, तर त्यांनी रॉलय लाईफ स्टाईल अनेकांना प्रेरणा देते. सेलिब्रिटींचे भव्य घर, त्यांच्या महागड्या गाड्या इत्यादी गोष्टी चर्चेत असतात. रॉयल लाईफ स्टईल जगणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे, अभिनेता विजय देवरकोंडा. दाक्षिणात्य कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय असणाहा विजय कायम चर्चेत असतो. विजय एका भव्य घरात राहतो.
सूत्रांच्या माहितीनुसार विजयच्या या नव्या आणि तितक्याच आलिशान अशा घराची किंमत आहे, तब्बल 20 कोटी रुपये. सर्वसामान्यांच्या भुवया उंचावतील इतक्या रकमेचं विजयचं हे घर अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत शुभाशिर्वाद मागणाऱ्या या अभिनेत्यावर या नव्या घराच्या निमित्ताने यशाची बरसात होवो, अशा शुभेच्छा अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत.
'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाच्या निमित्ताने विजयच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली होती. त्याने साकरलेल्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
येत्या काळात तरुणींच्या गळ्यातील ताईत असणारा हा अभिनेता आणखी कोणत्या बहुविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.