मुंबई : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा सध्या लिगर चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या न्यूड पोस्टरने तर मोठा धुमाकूळच केलाय.त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागलीय. करोडो तरूणींचा क्रश असलेला विजय देवरकोंडा तितक्याच कोटीच्या संपत्तीचा मालक देखील आहे. नेमक्या किती कोटीच्या संपत्तीचा मालक आहे? तसेच एका सिनेमासाठी किती कोटी आकारतो याची माहिती जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय देवरकोंडा आजच्या काळातला सर्वांत हिट अभिनेता आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी तुफान कमाई केली आहे.त्यामुळे तो आलिशान आयुष्य जगतोय. आलिशान घर, लक्झरी कार, प्राईवेट जेट अशी आलिशान आयुष्य तो जगतोय. 


आलिशान घर
हैदराबादच्या ज्युबली हिल्स या पॉश भागात विजय देवरकोंडा आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांचा एक बहुमजली बंगला देखील आहे, ज्यात सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत. महेश बाबू, नागार्जुन, चिरंजीवी आणि अल्लू अर्जुन यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या शेजारी तो राहतो. या त्याच्या बंगल्याची किंमत 15 कोटी रूपये असल्याची माहिती आहे. 



लक्झरी कार
विजय देवरकोंडा आलिशान कारचाही शौकीन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये अनेक महागडी वाहने पार्क आहेत. विजयकडे पाच सीटर सेडान आहे. या कारची किंमत 61.48 लाख रुपये आहे. तर फोर्डची कंपनीची मस्टँग कार देखील आहे, या कारची किंमत 75 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे Volvo XC 90 आहे, ज्याची किंमत 85 लाख रुपये आहे. तसेच एक रेंज रोव्हर देखील विजय देवरकोंडा आहे. अशा आलिशान कारचा तो शौकीन आहे. 



खाजगी जेट 
विजय देवरकोंडा जवळ एक खाजगी जेट देखील आहे. ज्यामध्ये तो अनेकदा कुटुंबासह प्रवास करताना दिसला आहे.गेल्या वर्षी विजय देवरकोंडा हे संपूर्ण कुटुंबासह तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. दरम्यान चार्टर्ड फ्लाइटमध्ये बसलेले त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसतील. 


यशस्वी बिझनेसमन
अभिनयाव्यतिरिक्त फक्त काही कलाकारच बिझनेसमध्ये हात अजमावतात, त्यातल्या एका नावात विजय देवराकोंडा यांचाही समावेश आहे. अभिनेता असण्यासोबतच विजय देवरकोंडा एक निर्माता आणि व्यापारी देखील आहे. त्याची स्वतःची क्लोदिंग लाइन राउडी क्लब आहे, ही त्यांची कंपनी Myntra सोबत जोडली आहे. अभिनेत्याचा हा ब्रँड चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.


संपत्तीचा मालक 
मीडिया रिपोर्टनूसार विजय देवरकोंडा त्याच्या एका चित्रपटासाठी 10 ते 11 कोटी रुपये घेतो. याशिवाय विजय देवरकोंडा अनेक ब्रँड्सना एंडोर्स देखील करतो. विजय देवरकोंडाची एकूण संपत्ती 30 कोटी आहे.