गणेशोत्सव २०१९ : `प्रथम तुला वंदितो`, गणेशोत्सवाला `या` गाण्यांचा स्वरसाज
गणपती बाप्पा मोरया...
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सारे गणेश भक्त बाप्पाच्या आगमची वाट पाहत. अखेर बाप्पा उद्या अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये त्याचप्रमाणे घराघरात विराजमान होतील. संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजर होणाऱ्या गणेशोत्सवाला जोड असते ती म्हणजे मराठी गणपती गाण्यांची. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही शुभ काम करण्याआधी गणपतीची पूजा करण्यात येते. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गायकांच्या आवाजात बाप्पांची गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. त्यातील काही अत्यंत गाजलेली गाणी...
कट्यार काळजात घुसली- 'सूर निरागस हो'
व्हेंटीलेटर - 'या रे या सारे या'
लोकमान्य-एक युगपुरुष - 'गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना'
रेडू - 'देवाक काळजी रे'
उलाढाल - 'देवा तुझ्या दारी आलो'
दगडी चाळ - 'मोरया मोरया'