मुंबई : टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)’फेम  बतीता जी (Babita Ji) उर्फ मुनमुन दत्ताने  (Munmun Dutta) तिच्या बोलण्याच्या शैलीने आणि  बोल्ड अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं नाही. मुनमुनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मुनमुन कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करते. आता देखील मुनमुन काही फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या आयुष्यात अठवणींचं गाठोडं असतं. कधीतरी अचाणक ते गाठोडं आपल्याला मिळतं आणि जुन्या क्षणांमध्ये आपण रमतो. असचं काही झालं आहे 'तारक मेहता...' फेम बबितासोबत. मुनमुन नुकताचं नव्या घरात राहायला गेली आहे. यावेळी सामानाची आवराआवर करत असताना तिला स्वतःचे काही जुने फोटो सापडले. 



तेच फोटो मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये ती 'शोले' चित्रपटातील कालियासोबत दिसत आहे. फोटोमध्ये दोघे एकत्र दिसत आहे. याशिवाय तिने अभिनयाचा प्रवास करताना आलेल्या आठवणींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. 


फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'नवीन अपार्टमेंटमध्ये आवरा-आवर करत असताना या जुन्या आठवणी एका सुटकेसमध्ये बंद केलेल्या आढळल्या. मला आयुष्यात आलेल्या या सर्व अनुभवांसाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे...' असं म्हणतं मुनमुनने चाहत्याचे आभार व्यक्त केले..