मुंबई : कोरोना व्हायरसमुळं लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईत अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना आपआपल्या राज्यात पाठवण्यासाठी म्हणून अभिनेता सोनू सूद यांन बरीच मेहनत घेतली. आपल्या जबाबदारीवर त्यानं हजारो मजुरांच्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक गरजुंच्या मदतीला धावून आलेल्या या अभनिनेत्यानं त्याचं हे काम अविरतपणे सुरुच ठेवलं आहे. मग ते कोणाला आर्थिक सहाय्य करणं असो, किंवा कोणा एका मजुराच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणं असो. आता सोनू सूद आणि SpiceJet ही विमानसेवा पुरवणारी कंपनी यांनी एकत्र येत परराष्ट्रात असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचा निर्णय़ घेतला आहे. 


किंबहुना विद्यार्थ्यांना किर्गिस्तानमधून मायदेशी आणण्याचं काम सुरुही झालं आहे. सध्याच्या घडीला मिळालेल्या माहितीनुसार Bishkek येथून १३५ विद्यार्थी गुरुवारी भारतात आले. या मोहिमेअंतर्गत १५०० विद्यार्थ्यांना परत आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.




 


दरम्यान, कोरोना महामारीमुळं किर्गिस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सोनूनं काही दिवसांपूर्वी एक हेल्पलाईन सुरु केली होती. मुख्य म्हणजे रस्ते आणि रेल्वे मार्गानं स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवल्यानंतर आता थेट हवाई मार्गानं विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी सोनूनं घेतली आहे. त्याच्या याच निर्णयामुळं सर्वच स्तरांतून पुन्हा एकदा त्याची स्तुती करणयात येत आहे.