Splitsvilla 14 Hiba Trabelssi On Human Trafficking​ : MTV वरील स्प्लिट्सव्हिला (Splitsvilla) हा रिअॅलिटीशो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. स्प्लिट्सव्हिलाच्या पहिल्या सीझनपासून या शोचे सुत्रसंचालन रणवीजय सिंगनं (Rannvijay Singh) केलं होतं. तर आता अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) या शोचे सुत्रसंचालन करत आहे. सध्याचा सीझन हा उर्फी जावेदमुळे (Urfi Javed) चांगलाच चर्चेत राहिला आहे. तर आता एका स्पर्धकानं केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आहे. Splitsvilla 14 मध्ये हिबा ट्रॅबेलसी (Hiba Trabelssi) ही एक स्पर्धक असून तिनं केलेल्या धक्कादायक खुलाशानं तुम्हालाही अश्रू होणार नाही. भारतात आल्यानंतर तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याविषयी तिनं खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिबाला अभिनय क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तिनं मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात केली. हिबाला एका चित्रपटात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफची बॉडी डबल म्हणून काम मिळाले होते. हिबानं स्प्लिट्सव्हिला 14 मध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एण्ट्री केली. यावेळी स्वत: ची ओळख करून देत असताना हिबानं तिच्यासोबत झालेल्या मानवी तस्करीविषयी मोठा खुलासा केला. मानवी तस्करीचे शिकार झाल्याचे सांगत हिबा म्हणाली, तिचे अपहरण झाले होते, त्यानंतर तिला काळोख असलेल्या एका रुममध्ये बंद केले. त्यानंतर एका व्यक्तीनं सांगितलं की तुझे अपहरण झाले आहे. त्या व्यक्तीनं मला तीन दिवस पाणी किंवा मग खायला सुद्धा दिले नाही. त्यावेळी हिबाला वाटले की हा तिच्या जीवनाचा शेवट आहे. 


हेही वाचा : Anupama मालिकेत अनुज आणि अनुपमाला Kiss करताना पाहून नेटकरी म्हणाले, 'हा एपिसोड...'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याविषयी बोलताना हिबा म्हणाली, ज्या व्यक्तीवर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवला त्याच व्यक्तीनं विश्वासघात केला. हा काळ माझ्या आयुष्यातील सगळ्या वाईट काळ होता. मला प्राण्यांसारखे वागवले गेले. माझे अपहरण करून तीन दिवस अन्नपाण्याविना एका खोलीत कोंडून ठेवले. पण, मी हार मानली नाही. प्रयत्न केला आणि त्या स्वत: बाहेर पडले. त्या घटनेने मी घाबरले. पण, या घटनेनेही मला धीर देखील दिला. माझ्या मनावर आणि शरीरावर त्याचा परिणाम झाला, पण तरीही मी पुढे गेले. स्प्लिट्सव्हिलामध्ये आल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. आता पुढे सगळं चांगलं होईल अशी आशा. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा गॉडफादरशिवाय काम मिळणे खूप कठीण होते. मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे आणि पुढे जात आहे. मला पूर्ण विश्वास आहे की एक दिवस मला नक्कीच यश मिळेल.