netflix most watched web series : ओटीटीच्या माध्यमातून दर आठवड्याला नवनवीन वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. यात काही सीरिज अश्या असतात ज्या सगळ्यांचचं मन जिंकून घेतात. अगदी लहान मुलांनादेखील या वेब सीरिजचं वेड लागतं. अशीच एक सीरिज म्हणजे नेटफ्लिक्सवरील कोरियन कलाकृती 'स्क्विड गेम'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीरिजने सगळ्याचं वेब सीरिजना मागे टाकले. या कलाकृतीला इतके प्रेम मिळाले की फक्त कोरियाच नव्हे तर संपूर्ण जगात या तिला प्रेक्षकपसंती मिळाली. जगभरात सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली सीरिज म्हणजेसुद्धा 'स्विड गेम'


'स्क्विड गेम'मुळे नेटफ्लिक्सला किती नफा झाला?
'स्क्विड गेम'साठीचं बजेट अर्थात सीरिजचा निर्मिती खर्च जवळपास 21 मिलियन ( 2.10 कोटी) इतका होताय फिल्म क्रिटिक आणि चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाच्या माहितीनुसार 'स्क्विड गेम'ला नेटफ्लिक्सने 21 मिलियन डॉलरला विकत घेतले आणि रमेश बाला यांनी सांगितले की, या वेबसीरिजने नेटफ्लिक्सवर तब्बल 891 मिलियन डॉलर इतकी कमाई केली. 


जगभरातील 94 देशात या सीरिजला सर्वाधिक व्ह्अरशिप मिळाली. पहिल्या चार आठवड्यातच सीरिज 142 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिली. 


काय आहे या सीरिजची कथा?
'स्क्विड गेम'मध्ये हा एक 456 लोकांसोबत खेळला जाणारा खेळ होता. या खेळात त्यांना एका रहस्यमयी ठिकाणी नेऊन त्यांच्यासोबत जीवघेणे खेळ खेळत आणि हे जीवघेणे खेळ खेळल्यावर त्यांना मोठी रक्कम मिळेल, असे त्यांना सांगितले गेले. जो या खेळात हरेल त्याला आपला जीव गमवावा लागत होता. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळा खेळ आणि त्यात असलेले खेळाडू हे जोमाने खेळ खेळत होते. त्यातील अनेक खेळाडूंचा मृत्यू देखील झाला. ही सीरिज पाहताना प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. एक अनोखी कथा हीच या सीरिजची जमेची बाजू आहे. 


हेही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/a-300-crore-film-with-18-actors-will-be-working-together-in-the-movie-housefull-5/864914


'स्क्विड गेम'चा नवा सिझन कधी येणार ? 
या सीरिजच्या पहिल्या पर्वाला मिळालेल्या यशानंतर प्रेक्षक आता दुसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या सीरिजचा पुढील सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटला येणार असून, 26 डिसेंबर 2024 ला तो प्रदर्शित होणार आहे.