COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : वादात अडकलेला पद्मावत हा सिनेमा. 


सुप्रीम कोर्टाने देशभर या सिनेमाला प्रदर्शनासाठी सहमती दिली आहे. यानंतरही या सिनेमाला होणारा विरोध काही थांबलेला नाही. करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह काल्वी यांनी म्हटलं आहे की, 25 जानेवारी प्रदर्शनाच्या दिवशी सगळीकडे कर्फ्यू लागणार आहे. जर कुणाला सिनेमा पाहण्याची इच्छा असेल तर माझं म्हणणं आहे की, त्यांनी हा सिनेमा पाहू नये. 


हा सगळा गोंधळ असताना सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आपले आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना हा सिनेमा दाखवला. आणि त्यांच्याकडून खूप सकारात्मक बाब समोर आली आहे. सोमवारी संजय लीला भन्साळी यांनी बंगलुरूच्या आर्ट ऑफ लिविंह सेंटरमध्ये पद्मावत या सिनेमाचं स्क्रिनिंग ठेवलं होतं. 



या सिनेमाला पाहून श्री श्री रवी शंकर यांनी भरपूर कौतुक केलं. यावेळी दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंह देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं की मला कळत नाही या सिनेमाला एवढा विरोध का होत आहे. या सिनेमांत राजपूत समाजाचा गौरव करण्यात आला आहे. हा सिनेमा म्हणजे राणी पद्मिनीला देण्यात आलेली सुंदर आदरांजली आहे. 


श्री श्री रवीशंकर म्हणाले की, लोकांनी पद्मावत हा सिनेमा लोकांनी साजरा केला पाहिजे. या सिनेमावर त्यांनी गौरव केलं पाहिजे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमाला मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात मध्ये बॅन करण्यात आली आहे.