Sridevi 60th Birth Anniversary : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानं हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली होती. आज त्या असत्या तर 60 वर्षांच्या झाल्या असत्या. श्रीदेवी यांना कोणीच विसरू शकत नाही. आज त्यांचा 60 वा वाढदिवस आहे. त्यांना जाऊन यावर्षी पाच वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्या अभिनयाचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. एका छोट्याश्या गावातून आलेली एक मुलगी अभिनयाच्या क्षेत्रात येते आणि तिच्या विनोदानं सर्वांनाच खळखळून हसवते. जेव्हा मोठ्या मोठ्या नायिका या मोठ्या पडद्यावर अधिराज्य गाजवत होत्या तेव्हा अशाच एका हरहून्नरी अभिनेत्रीनं आपलं संपुर्ण जीवनच बदलून टाकलं. तिच्या अनोख्या अभिनयानं आपल्या सगळ्यांनाच घायाळ करून सोडले. सोबतच तिच्या अभिनयाचीही जादू प्रेक्षकांवर खिळली होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला विसरणं हे शक्यच नाही. सोबतच श्रीदेवी यांच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आणि बोनी कपूर यांच्या नात्याविषयी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला माहितीच आहे की श्रीदेवी यांचा 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तेव्हा श्रीदेवी यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली होती. किंबहुना या चित्रपटाच्या दरम्यानच श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यातील जवळीक ही वाढू लागली होती. तेव्हा त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले होते. बॉनी कपूर यांनी कबुल केले होते की त्यांना श्रीदेवी या पहिल्याच नजरेत प्रचंड आवडल्या होत्या. तेव्हा त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वानं बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांनी पुर्णत: मोहित करू टाकले होते. त्यामुळे त्यांनी श्रीदेवी यांच्याशी अधिक जवळीक व्हावी म्हणून मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी अधिक मानधन दिले आणि तेव्हा श्रीदेवी यांनी हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला मग त्यांच्यातील जवळीक याचं चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान वाढू लागली. बोनी कपूर तेव्हा निर्माते होते. 


हेही वाचा - Photos: इतकी मोठी झाली? आराध्या बच्चनचा मेकअपमधला नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय


इंडिया टूडे वुमन सबमिट 2013 च्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी ते श्रीदेवी यांच्या प्रेमात कसे पडले याची ग्वाही दिली होती. ते म्हणाले होते की, ''श्रीदेवीला मी पहिल्यांदा पहिले ते म्हणजे 1970s च्या काळात आलेल्या एका तामिळ चित्रपटात. तिचा तो चित्रपट मी पाहिला होता आणि मी अक्षरक्ष: तिच्या प्रेमात पडलो होतो. मला तो चित्रपट पाहून झाल्यानंतर तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे होते. मी त्यासाठी खासकरून स्वत:हून चेन्नईला गेलो परंतु तिथे ती नव्हतीच. ती सिंगापूरला शुटिंगसाठी गेली होती. मग मी परत मुंबईला आलो तेव्हा मी फारच निराश झालो की तिची आणि माझी भेट झाली नाही.'' 


''मी तिचा 1979 साली आलेला सोलहवा सावन हा चित्रपट पाहिला होता. तेव्हा मी ठरवलं की यावेळी तिला फिल्म सेटवर तर भेटायचंच. तेव्हा मी तिला एका फिल्मसाठी ऑफर द्यायला गेलो होतो. त्यातून ती फारच आत्ममग्न आणि अबोल होती. तेव्हा तिनं तिच्या आईला याबाबत विचारायला मला सांगितलं. तेव्हा श्रीदेवीच्या आईनं माझ्याकडे या चित्रपटासाठी 10 लाख रूपयांची मागणी केली. परंतु मी त्यांना 11 लाख रूपये देण्याची ग्वाही दिली आणि तेव्हा त्या माझ्यावर खुश झाल्या.'' अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. श्रीदेवी लग्नाआधी प्रेग्नंट होती आणि त्यावेळी बोनी कपूर हे विवाहित होते. तेव्हा त्यांनी 1996 साली लग्न केले. 1997 साली जान्हवी कपूरचा जन्म झाला.