मुंबई : 2018 च्या सुरूवातीलाच एक व्हिडिओ क्लिप वायरल झाली ज्या व्हिडिओमुळे एका रात्रीतच अभिनेत्री प्रिया प्रकाश वारिअर सेलिब्रिटी बनली होती. या व्हिडिओत प्रियाने आपल्या नजरेने नेटीझन्सना घायाळ केलं आणि आपली दखल घ्यायला लावली होती. हीच प्रिया आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास तयार झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिया प्रकाशच्या 'श्रीदेवी बंगलो'या सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. मल्यालम सिनेमा Oru Aadar Love या सिनेमातून प्रकाशझोतात आलेल्या प्रियाचा 'श्रीदेवी बंगलो' हा पहिला बॉलिवूड सिनेमा आहे. पण या टिझरनंतर प्रिया सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे. 



हा टिझर पाहताच कळतं की, हा सिनेमा बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला यावर आधारित आहे. पण या सिनेमात असा कुठेच उल्लेख नाही की, यामधून अभिनेत्री श्रीदेवीला ट्रिब्यूट दिला आहे किंवा तिच्या मृत्यूवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमामुळे चाहत्यांच्या मनात घर केलेल्या प्रियाला मात्र आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. 


या टिझरमध्ये दाखवलं आहे की, श्रीदेवी खूप लोकप्रिय अभिनेत्री आहे. देश-विदेशात तिचे चाहते आहेत. लोकप्रिय असलेली श्रीदेवी एकटी कशी जगत होती हे देखील या टिझरमध्ये दाखवलं आहे. तसेच स्विमिंग करणाऱ्या श्रीदेवीचा जेव्हा दारूचं सेवन करून बाथटबमध्ये तिचा मृत्यू होतो तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. 


या टिझरमध्ये शेवटचा सीन तुम्हाला विचलित करू शकतो. शेवटी बाथटबच्याबाहेर ज्या प्रकारे पाय दाखवले आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे की, हा सिनेमा श्रीदेवीसोबत झालेल्या दुर्घटनेबाबत आहे.