मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्नबंधनात अडकतेय. तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असताना सोनमच्या गाण्यावर श्रीदेवीचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ८ मेला सोनम आनंद आहुजासोबत लग्न करत असल्याच्या बातमीला काही दिवसांपूर्वी कपूर फॅमिलीने दुजोरा दिला होता. लग्नाला आता अवघे काही दिवस उरलेत. यामुळेच लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. यादरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडीओत श्रीदेवी शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवीचा हा व्हिडीओ खूप जुना आहे आणि हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओत सोनम कपूरच्या प्रेम रतन धन पायो या गाण्यावर श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी डान्स करताना दिसतायत. सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय. रिपोर्टस्नुसार सोनमच्या संगीत सोहळ्यात जान्हवी आपली आई श्रीदेवीच्या गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे. 



सोनम ८ मेला आपला बॉयफ्रेंड आनंद आहुजा हिच्यासोबच लग्न करणार आहे. सोनमने काही दिवसांपूर्वी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये लग्नाबाबत विधान केले होते. त्यावेळी तिला विचारले होते लग्नासाठी तिला कसे दिसायला आवडेल. यावेळी सोनमने एका कंफर्टेबल ब्राइडल लूकमध्ये दिसायला आवडेल असे म्हटले होते.