VIDEO: हे होतं श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं, १९७९ मध्ये आला होता सिनेमा
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक जुन्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे. श्रीदेवीचे अनेक फोटोज, तिच्या गाण्यांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियात शेअर केले जात आहेत. अशातच तिच्या पहिल्या हिंदी गाण्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
श्रीदेवीची सर्वच गाणी सुपरहिट ठरली. ही गाणी तिच्या खास डान्समुळे आणि तिच्या खास एक्प्रेशनमुळे आजही लाखोंच्या स्मरणात आहेत आणि पुढेही राहतील. पण तिचं पहिलं हिंदी गाणं जास्त लोकप्रिय नाही. या गाण्यात श्रीदेवी अनेकांना ओळखायलाही येणार नाही, इतकी ती वेगळी दिसते आहे.
केवळ चार वर्षांची असताना श्रीदेवीने ‘थिरूमुगम’ या तमिळ सिनेमातून अभिनयाला सुरूवात केली होती. त्यानंतर श्रीदेवीने तमिळ, मल्याळम आणि हिंदी अशा इंडस्ट्रीत ३०० सिनेमात काम केलं. श्रीदेवीचा पहिला सिनेमा १९७९ मध्ये आलेला ‘सोलवां सावन’ हा होता. या सिनेमातील ‘पी कहां...’ हे श्रीदेवीचं पहिलं हिंदी गाणं. त्यानंतर तिने कधीही मागे वळूण पाहिले नाहीच. नंतर ‘हिम्मतवाला’ आणि ‘तोहफा’ या सिनेमातून तिने देशभरात धुमाकूळ घातला. ती बॉलिवूडची पहिली मोठी डान्सर म्हणून लोकप्रिय झाली. पण तिचं पहिलं गाणं अनेकांना माहितीही नसेल.