कान्समध्ये श्रीदेवीचा गौरव, सुभाष घईंंनी स्वीकारला पुरस्कार
दुबईमध्ये काही महिन्यांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीची पहिली सुपरस्टार श्रीदेवी यांचा अकाली मृत्यू झाला.
मुंबई : दुबईमध्ये काही महिन्यांपूर्वी हिंदी सिनेसृष्टीची पहिली सुपरस्टार श्रीदेवी यांचा अकाली मृत्यू झाला. श्रीदेवीच्या अकाली निधनाने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जगभरात श्रीदेवींनी आपल्या अभिनयाची जादू पसरली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या सिनेसृष्टीतील कार्याचा गौरव कान्स या जागतिक आणि मानाच्या समजल्या जाणार्या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला.
कान्समध्ये गौरव
श्रीदेवींना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये 'टाइटन रेगिनाल्ड एफ लुईस फिल्म आयकॉन' या पुरस्काराने गौरव करण्यात आला. कपुर कुटुंबीयांतर्फे हिंदी सिनेसृष्टीतील सिने निर्माते सुभाष घई आणि निर्माता नम्रता गोयल यांनी स्विकारला. हा पुरस्कार जगभरात सिने सृष्टीत काम करणार्या महिलांना दिला जातो.
बोनी कपूरनी व्यक्त केले आभार
बोनी कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीदेवींना मिळाला सन्मान, ओळख, श्रद्धांजली आणि त्यांच्या चाहत्यांनी दिलेलं प्रेम यांचे ते आभारी आहेत. या प्रेमाची मला जान्हवी कपूर आणि खुशी कपूरला जाणीव आहे. त्याबद्दल धन्यवाद ! असे त्यांनी सांगितले आहे. श्रीदेवी ही लाखो लोकांसाठी प्रेरणा आहे. श्रीदेवी त्यांच्या कामाच्या रूपाने आपल्यात जिवंत आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
मॉम चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार
'मॉम' या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रीदेवींना 65 व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरव करण्यात आला.