पणजी : गोव्यात इंडियन पॅनोरमाचं अभिनेत्री श्रीदेवी हिच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पिहू आणि पुष्कर पुराणनं पॅनोरमाची सुरुवात झाली. न्यूड आणि एस दुर्गा चित्रपट ऐनवेळी वगळल्याने इंडियन पॅनोरमा चर्चेत आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातल्या 48व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वादग्रस्त ठरलेल्या  इंडियन पॅनोरमाचं उद्घाटन, चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते झालं. इंडियन पॅनोरमा 2017 अंतर्गत विविध भागातल्या बहुभाषिक 26 कथापट आणि 16 कथाबाह्य चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. 


यावेळी इंडियन पॅनोरमा 2017 मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रथितयश आणि उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शकांना, श्रीदेवी यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. इंडियन पॅनोरामाची सुरुवात पिहू आणि पुष्कर पुराण या चित्रपटानं झाली. 


दरम्यान इंडियन पॅनोरामामधून न्यूड आणि एस दूर्गा हे चित्रपट ऐन वेळी वगळल्यानं, टीकेची झोड उठली होती.