मुंबई : श्रीदेवीचं पार्थिव विलेपार्लेतील स्मशानभूमीजवळ पोहोचलं असून श्रीदेवीच्या अंत्यविधीला सुरूवात झाली आहे. अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. तर सोबतच मोठ्या प्रमाणात तिच्या चाहत्यांनीही अलोट गर्दी केली आहे.  










लारा दत्ता, महेश भूपती, प्रसून जोशी, दिया मिर्झा, शाहरूख खान, रणधीर कपूर स्मशानभूमीत दाखल झाले आहे. आधी ठरल्याप्रमाणे ३.३० मिनिटांनी श्रीदेवीवर अंत्यसंस्कार होणार होते. मात्र चाहत्यांच्या झालेल्या गर्दीमुळे श्रीदेवीचं पार्थिव स्मशानभूमीत पोहोचायला बराच उशिर झाला.