मुंबई : शनिवारी रात्री अभिनेत्री श्रीदेवी यांचे अकाली निधन झाल्याने अवघे बॉलिवूड हळहळले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदी सिनेमाप्रमाणेच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रीदेवीने काम केले आहे. त्यामुळे श्रीदेवीच्या निधनानंतर दाक्षिणात्य कलाकरांनीही शोक व्यक्त केला आहे.  


सुपरस्टार रजनीकांतसह अनेक सेलिब्रिटी दक्षिण भारतातून मुंबईत आले आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रीदेवींना श्रद्धांजली दिली आहे.  


रजनीकांत आणि श्रीदेवी एकत्र  


रजनीकांत आणि श्रीदेवी यांनी चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. बालकलाकाराच्या भूमिकेतून श्रीदेवींची सिनेसृष्टीमध्ये एन्ट्री झाली. एका चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्या आईची भूमिका श्रीदेवींनी साकारली होती. यावेळेस श्रीदेवी अवघ्या 13 वर्षांच्या होत्या. 


 'Moondru Mudichu'या चित्रपटामध्ये रजनीकांत 26 वर्षांचे आणि त्यांच्या आईची भूमिका साकारणारी श्रीदेवी अवघ्या 13 वर्षाच्या होत्या. या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्या सावत्र आईची भूमिका श्रीदेवींनी केली होती.  


4 वर्षांची श्रीदेवी रूपेरी पडड्यावर  


1963 साली श्रीदेवींचा दक्षिण भारतात जन्म झाला. 1967 साली बालकलाकाराच्या भूमिकेत त्याच्या फिल्मी करियरला  सुरूवात झाली. हिंदीप्रमाणे त्यांनी तेलगू, मल्याळम, तामिळ,कन्नड चित्रपटात काम केले. लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर गेलेल्या श्रीदेवी 'इंग्लिश विग्लिश' चित्रपटातून पुन्हा हिंदी सिनेमात आल्या होत्या.