मुंबई : श्रीदेवीच्या अचानक जाण्याचं दुःख आजही लोकांना आहे. त्या या दुःखातून सावले नाहीत. श्रीदेवीचा चाहता वर्ग हा फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. श्रीदेवी प्रती असलेलं हे प्रेम आपल्याला एका वेगळ्या उदाहरणातून समोर येणार आहे. स्विस सरकार श्रीदेवीच्या निधनानंतरही तिला ट्रिब्यूट देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिच्या सिनेमांमध्ये स्वित्झलँडचं शुटिंग अधिक होतं. या सिनेमांच्या माध्यमातून भारतीय पर्यटक स्वित्झलँडकडे अधिक आकर्षित झाले. यश चोप्रा यांच्यानंतर आता स्वित्झलँडमध्ये श्रीदेवीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. श्रीदेवी ही पहिली अभिनेत्री आहे जिने स्वित्झलँडच्या डोंगरांवर गाणं चित्रीत केलं आहे. श्रीदेवीचा स्वित्झलँड पर्यटनातील योगदान पाहता हा पुतळा उभारण्यात येणार आहे.  


श्रीदेवीच्या सिनेमांमधून स्वित्झलँडमधील सुंदर लोकेशन्स जगभराच पोहचले. श्रीदेवी आणि शाहरूख खानच्या अनेक सिनेमांमुळे पर्यटक येथे आले. इथे येणारे पर्यटक त्या जागांना पुन्हा भेटी देतात. त्यामुळे सिनेमातील तो क्षण उभा राहतो. 1994 मधील 'संगम' हा सिनेमा स्वित्झलँडमध्ये शूट केला आहे. या सिनेमापासून याला सुरूवात झाली.