सेलिब्रिटी काकावर जडला जीव, पण पुतण्याशी केलं लग्न; तवायफची लेक अशी बनली बॉलिवूडची राणी

Neetu Singh Birthday : आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने वयाच्या 8 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. त्यानंत रणधीर कपूर, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नासोबत कामं केलं. तर प्रेम आणि लग्नासाठी तिने करिअरला ब्रेक लावला. 

| Jul 08, 2024, 09:15 AM IST
1/9

बालकलाकार म्हणून काम सुरु केल्यानंतर पहिल्याच चित्रपटातून तिने आपला ठसा उमटवला. पण या चिमुकलीचं बालपण खूप संघर्षमय होतं. आई तवायफ जगातून पळून मुंबईत आली. तिने बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आणि लेकीला अभिनेत्री बनवलं. 

2/9

आम्ही बोलत आहोत, नीतू सिंह कपूर यांच्याबदद्ल. आज त्यांचा 66 वा वाढदिवस आहे. आज नीतू कपूर हे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. कपूर घरण्याची सून आता आजी झाली आहे. मुलगा आणि सून दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. 

3/9

नीतू कपूरची आजी आणि आई या दोघी गणिका म्हणजे तवायफ होत्या. नीतू यांच्या आजीने हे जग दत्तक घेतलं होतं पण नीतू आणि त्यांची आई या नरकमय जगातून बाहेर पडल्या. 

4/9

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, नीतू हे त्यांचं खरं नाव नाही. त्यांचं खरं नाव हरनीत सिंह होतं. आई राजी सिंह यांनी नीतूला अभिनेत्री बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अवघ्या 8 व्या वर्षी राजश्री प्रॉडक्शनमधून बालकलाकार म्हणून काम सुरु केलं. तिथे त्यांना बेबी सोनिया हे नाव मिळालं. 

5/9

लता मंगेशकर यांनी गायलेले बेबी सोनियावरील बच्चे मन के सच्चे हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर राजी सिंह मुलीसह 3 वर्ष गायब झाल्या. त्यानंतर त्या परतल्या नीतू सिंग या नावासह. तोपर्यंत लोक बेबी सोनियाला विसरले होते. पहिलाच चित्रपट मिळाला तो रणधीर कपूरसोबत रिक्षावाला. पण तो चित्रपट फ्लॉप झाला. 

6/9

त्यानंतर राजी यांनी नीतू यांचे बोल्ड फोटोशूट करुन घेतलं आणि ते मासिकांमध्ये प्रसिद्ध केलं. त्यानंतर नीतू सिंहसमोर साईन घेण्यासाठी चाहत्यांचा रांगा लागल्या. 

7/9

करण जोहरच्या शोमध्ये नीतू सिंह यांनी सांगितलं होतं की, ऋषी कपूर हे त्यांचं पहिलं प्रेम नव्हतं. तर ऋषी कपूरचे काका शम्मी कपूर खूप आवडायचे. पण त्यांनी लग्न ऋषी कपूरशी केलं. 

8/9

कपूर घराण्यातील सूना या लग्नानंतर काम करत नव्हत्या. त्यामुळे या लग्नाला आईचा विरोध होता. पण लेकीच्या प्रेमासमोर त्यांनी माघार घेतली आणि 1980 मध्ये नीतू यांनी ऋषी कपूरशी लग्न केलं आणि करिअरला गूड बाय केलं. 

9/9

पण आज ऋषी कपूरच्या निधनानंतर नीतू यांनी बॉलिवूडमध्ये पुन्हा कामाला सुरूवात केली आहे. तर नीतू सिंह यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्याकडे 37 कोटींची संपत्ती आहे. तर 17 कोटींचं आलिशान बंगला आहे.