जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी?
अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरवर नाकाच्या सर्जरीनंतर, पुन्हा सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी कपूर नुकतीच कॅलिफोर्निया व्हेकेशनवरुन आली आहे.
जान्हवी आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि बहिण खुशीसोबत ती कॅलिफोर्नियाला सुट्टी एन्जॉय करत होती. मात्र एका फोटोमुळे सध्या जान्हवीच्या लूकबाबत बरीच चर्चेला उधाण आलं आहे.
जान्हवी कपूरचा पिंक टॉपमधल्या जान्हवीचा लूक आकर्षक आहे, यात जान्हवीचे ओठ सर्वांचं लक्ष वेधून घेतात. तिचा वरचा ओठ मोठा दिसत होता, म्हणून तिने नुकतंच लिप जॉब केल्याची चर्चा आहे.
श्रीदेवीने तिची मुलगी जान्हवीसोबत फोटो शेअर केला. या फोटोत दोघीही फार सुंदर दिसत आहे. परंतु जान्हवीचे मोठे ओठ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, २० वर्षीय जान्हवी कपूरने यापूर्वी नाकावरही सर्जरी केली होती. त्यामुळे आता परफेक्ट ओठांसाठी तिने सर्जरी केल्याचं म्हटलं जात आहे.
जान्हवीचे पूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो पाहता तिच्या ओठांमध्ये झालेला बदल नक्कीच दिसण्याइतपत आहे.तिने खरंच लिप सर्जरी केली आहे की, हा मेकअपचा परिणाम आहे, हे कधीतरी स्पष्ट होणार आहे.