मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आता त्या स्टायलिश स्टार किडच्या लिस्टमध्ये आली आहे. जी कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मग कधी चर्चेत राहण्याचं कारण तिचा ड्रेसिंग सेन्स असो वा हॉटनेस. सुहाना खान सध्या लंडनमध्ये आपलं शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर कायम आपली एकापेक्षा एक फोटो शेअर करत असते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच सुहाना सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. तिच्या फॉलोअर्सची लिस्ट दिवसेंदिवस वाढत आहे. आताच सुहानाने एक हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोत सुहाना अगदी बिंदास अंदाजात कॉलेज फ्रेंडसोबत दिसत आहे. 





अनेक फोटोत सुहाना आपली नॅच्युरल ब्युटी दाखवताना दिसत आहे. तिचा नो - मेकअप लूक आणि लांब केस अतिशय ग्लॅमरस दिसत आहेत. तिचा हा अंदाज बघून लक्षात येतंय की ती या स्पॉट्ससाठी अगदी तयार आहे. स्पोर्ट्स वेअर मध्ये सुहाना खूप सेक्सी दिसत आहे.