SS Rajamouli Experience Earthquake In Japan : लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली हे त्यांच्या 'बाहुबली' आणि 'आरआरआर' या चित्रपटासाठी ओळखले जातात. सध्या त्यांच्या 'आरआरआर' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी जपानला पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण टीमनंही तिथे हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांच्यासोबत होता. तर त्यांना तिथे भूकंपाचे झटके बसले. याची माहिती स्वत: राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयनं जपानमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्याचा अनुभव सांगितला आहे. कार्तिकेयनं त्याच्या एक्स अकाऊंटवरून याविषयी सांगितलं आहे. त्यानं त्याच्या स्मार्ट वॉचचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यानं कॅप्शन दिलं की 28 व्या मजल्यावर होतो आणि हळू-हळू जमिन हलू लागली आणि हा भूकंप असू शकतो हा विचार करायला आम्हाला थोडा वेळ गेला. मी घाबरणारच होतो, पण आमच्या आजुबाजूला असणारे लोक हे एकदम शांत होते... जसं काही हळूच पाऊस येतो ना. जपानमध्ये आज म्हणजेच 21 मार्च रोजी खूप मोठा भूकंप आला होता. 



एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेयची ही पोस्ट पाहताच चाहत्यांची चिंता वाढली. त्यामुळे अशात प्रत्येक व्यक्ती म्हणजेच त्यांचे चाहते त्यावर कमेंट करत ते कसे आहेत याची विचारपूस करत आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही ठीक आहात. दुसरा नेटकरी म्हणाला की पुन्हा भूकंपाचे झटके येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही लक्ष ठेवा. 


हेही वाचा : 'लष्करी अधिकारी असून इतके छोटे कपडे!' दिशा पटानीच्या बहिणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल


राजामौली यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांना त्यांच्या आरआरआर या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार  मिळाले आहेत. त्यांच्या या चित्रपटात ज्यूनियर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. जपानमध्ये एसएस राजामौली यांचा हा चित्रपट गेल्या 513 दिवसांपासून दररोज सुरु आहे. तिथल्या लोकांना या चित्रपटाचे फार क्रेज आहे. जेव्हा राजमौली हे त्या स्क्रीनिंगला पोहोचले तेव्हा सगळ्या चाहत्यांनी त्यांच्या आजुबाजूला गर्दी केली. तरी राजमौली हे त्यांच्या सगळ्या चाहत्यांना भेटले.